मुंबई महापौर कॅरम स्पर्धेत संदीप व संगीता यांचे विजेतेपद

By admin | Published: March 16, 2016 08:38 AM2016-03-16T08:38:13+5:302016-03-16T08:38:13+5:30

संदीप देवरूखकर आणि संगीता चांदोरकर या अनुभवी व बलाढ्य खेळाडूंनी आपआपल्या अंतिम सामन्यात अपेक्षित विजय मिळवताना १९व्या मुंबई महापौर चषक कॅरम स्पर्धेत अनुक्रमे

Sandeep and Sangeeta won the Mumbai Mayor Carrom Championship | मुंबई महापौर कॅरम स्पर्धेत संदीप व संगीता यांचे विजेतेपद

मुंबई महापौर कॅरम स्पर्धेत संदीप व संगीता यांचे विजेतेपद

Next

मुंबई : संदीप देवरूखकर आणि संगीता चांदोरकर या अनुभवी व बलाढ्य खेळाडूंनी आपआपल्या अंतिम सामन्यात अपेक्षित विजय मिळवताना १९व्या मुंबई महापौर चषक कॅरम स्पर्धेत अनुक्रमे पुरुष व महिला गटाचे विजेतेपद पटकावले.
ओएनजीसी संघाकडून खेळणाऱ्या संदीपला विजेतेपदासाठी रिझर्व्ह बँकेच्या प्रशांत मोरेने चांगलेच झुंजवले. पहिला गेम २५-० असा सहजतेने जिंकल्यानंतर संदीपला प्रशांतने कडवी टक्कर दिली. या वेळी प्रशांतने काही अप्रतिम फटके मारताना झुंजाररीत्या २५-१२ अशी बाजी मारून सामना निर्णायक तिसऱ्या गेममध्ये नेला. यावेळी अनुभवी संदीपने आपला हिसका दाखवताना एकहाती वर्चस्व राखत २५-०, १२-२५, २५-८ अशा गुणांनी विजेतेपद निश्चित केले.
महिलांचा अंतिम सामना मात्र पूर्णपणे एकतर्फी झाला. रिझर्व्ह बँकेच्या संगीताने केलेल्या आक्रमक खेळापुढे पीसीडीएच्या प्रीती खेडेकरचा काहीच निभाव न लागल्याने तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. पहिला गेम २५-१४ असा जिंकल्याने संगीताने कामगिरीत सातत्य ठेवताना दुसऱ्या गेममध्ये २५-१३ अशी बाजी मारून प्रीतीला धक्का दिला.

Web Title: Sandeep and Sangeeta won the Mumbai Mayor Carrom Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.