संगमेश्वरच्या मुलींना विजेतेपद
By admin | Published: September 2, 2015 11:31 PM2015-09-02T23:31:42+5:302015-09-02T23:31:42+5:30
सोलापूर: शालेय शहरस्तरीय 19 वर्षांखालील खो-खो स्पर्धेत संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावल़े अंतिम सामन्यात भारती विद्यापीठ संघाचा 1 डाव आणि 5 गुणांनी पराभव केला़ विजयी संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली़
Next
स लापूर: शालेय शहरस्तरीय 19 वर्षांखालील खो-खो स्पर्धेत संगमेश्वर कनिष्ठ महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाने विजेतेपद पटकावल़े अंतिम सामन्यात भारती विद्यापीठ संघाचा 1 डाव आणि 5 गुणांनी पराभव केला़ विजयी संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली़या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचा एकतर्फी पराभव केला़ उपांत्यफेरीत ठोकळ विद्यालयावर वर्चस्व मिळवत अंतिम फेरी गाठली़या संघाचे संस्था सचिव धर्मराज काडादी, प्राचार्य डॉ़ डी़डी़ पुजारी, उपप्राचार्य बी़एऩपटणे, जिमखाना चेअरमन एल़एस़ गायकवाड, शारीरिक शिक्षण संचालक प्रा़ आनंद चव्हाण, प्रा़ संतोष खेंडे यांनी कौतुक केल़े (क्रीडा प्रतिनिधी)विजयी संघ-करिष्मा नाईक, नम्रता हळदे, अर्चना राठोड, लावण्या दुस्सा, ममता गड्डम, प्रज्ञा दराडे, कोमल व्हटकर, किरण बेंजारपे, प्रियांका विजापुरे, शीतल प्रचंडे, सुमैय्या शेख, रंजना लवट़ेफोटोओळी-शालेय खो-खो स्पर्धेत यश मिळविलेल्या संगमेश्वर ज्युनियर कॉलेजच्या संघासोबत आनंद चव्हाण, प्राचार्य डॉ़ डी. डी़ पुजारी, उपप्राचार्य बी़एऩ पटणे, जिमखाना चेअरमन एल़एस़ गायकवाड, संतोष खेंडे आदी़