सांगोल्याला पहिल्यांदा हिंदकेसरीचा मान

By admin | Published: February 2, 2015 03:20 AM2015-02-02T03:20:07+5:302015-02-02T05:27:59+5:30

४७ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत सांगोला तालुक्यातील सुनील साळुंखे याने चांदीची गदा जिंकली. उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सुनील याने जमखंडी

Sangola's first honor is Hindkeshri | सांगोल्याला पहिल्यांदा हिंदकेसरीचा मान

सांगोल्याला पहिल्यांदा हिंदकेसरीचा मान

Next

अरुण लिगाडे, सांगोला
४७ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत सांगोला तालुक्यातील सुनील साळुंखे याने चांदीची गदा जिंकली. उपमहाराष्ट्र केसरी पैलवान सुनील याने जमखंडी (कर्नाटक) येथील स्पर्धेत हरियाणाच्या हितेशकुमारला चितपट करीत हा बहुमान मिळविला आहे. विजयानंतर हिंंदकेसरी पैलवान सुनील साळुंखे याची भव्य मिरणुकीद्वारे अडीच किलो वजनाची चांदीची गदा व रोख पाच लाख रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सुनीलच्या रूपाने सांगोला तालुक्यास हिंंदकेसरी होण्याचा प्रथमच बहुमान मिळाला आहे.
जमखंडी (कर्नाटक) येथे २९ जानेवारी ते १ फेब्रुवारी या कालावधीत ही स्पर्धा अयोजित केली होती. या स्पर्धेसाठी भारतातील नामवंत कुस्तीपटू सहभागी झाले होते. चारदिवसीय चाललेल्या स्पर्धेत पैलवान सुनील साळुंखे याने हरियाणाचा रामपाल भोलू, महाराष्ट्राचा विक्रम शिंदे, जम्मू काश्मीरचा सुरेंद्रसिंहला चितपट करून लढतीत अंतिम फेरी गाठली होती.
आज, रविवारी हिंदकेसरी किताबासाठी पै. सुनील साळुंखे व हरियाणाचा पै. हितेशकुमार, पंजाबचा पै. कृष्णकुमार, एअरफोर्समधून पै. सतेेंद्र यांच्यात लढत झाली. या लढतीत सुनीलने हरियाणाच्या हितेशकुमारला पराभूत करून हिंदकेसरी ठरला.

Web Title: Sangola's first honor is Hindkeshri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.