सानिया-हिंगीस १४ व्या विजेतेपदापासून वंचित

By Admin | Published: April 26, 2016 05:34 AM2016-04-26T05:34:08+5:302016-04-26T05:34:08+5:30

सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीला सोमवारी पोर्च ग्रां.प्री. टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीतील अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला.

Sania-Hingis deprived of 14th winner | सानिया-हिंगीस १४ व्या विजेतेपदापासून वंचित

सानिया-हिंगीस १४ व्या विजेतेपदापासून वंचित

googlenewsNext

स्टुटगार्ड : भारताच्या स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस या अव्वल मानांकित जोडीला सोमवारी पोर्च ग्रां.प्री. टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीतील अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला. याबरोबरच या जोडीला १४व्या विजेतेपदापासून वंचित राहावे लागले.
अव्वल मानांकित सानिया-हिंगीस जोडीला अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित कॅरोलिना गार्सिया आणि क्रिस्टिना माल्देनोविच या जोडीकडून ६-२, १-६, ६-१० असा पराभव पत्करावा लागला. भारतीय-स्वीस जोडीने स्पर्धेतील उपांत्य फेरीतील सामन्यात जर्मनीच्या सिबाइन लिसकी आणि चेक गणराज्यच्या लुसी सफारोवा या जोडीचा ६-४, ७-५ असा पराभव केला होता. फेब्रुवारीनंतर प्रथमच त्यांनी एखाद्या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती. मात्र, अंतिम सामन्यात दुसऱ्या मानांकित फ्रान्सच्या जोडीने उत्कृष्ट खेळ करीत आॅस्ट्रेलियन ओपन विजेत्या सानिया-हिंगीस जोडीच्या विजेतेपद मिळविण्याच्या अपेक्षांवर पाणी फेरले.
सानिया-हिंगीस जोडीला याअगोदरही मियामी मास्टर्स आणि त्यानंतर इंडियन वेल्स स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला होता.

Web Title: Sania-Hingis deprived of 14th winner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.