सानिया, हिंगीसमध्ये अवघ्या ५ गुणांचे अंतर

By admin | Published: September 13, 2016 03:47 AM2016-09-13T03:47:39+5:302016-09-13T03:47:39+5:30

भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांच्यात सोमवारी जाहीर झालेल्या महिला दुहेरीच्या रँकिंगमध्ये फक्त ५ गुणांचे अंतर उरले आहे.

Sania, Hingis have only 5 points difference | सानिया, हिंगीसमध्ये अवघ्या ५ गुणांचे अंतर

सानिया, हिंगीसमध्ये अवघ्या ५ गुणांचे अंतर

Next

नवी दिल्ली : यशस्वी रथावर जवळपास दीड वर्ष एकमेकांच्या साथीने आरूढ राहिल्यानंतर आता वेगवेगळ्या जोडीदारांसह खेळणारी भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांच्यात सोमवारी जाहीर झालेल्या महिला दुहेरीच्या रँकिंगमध्ये फक्त ५ गुणांचे अंतर उरले आहे.
सानिया आणि हिंगीस यांनी गतवर्षी मार्च महिन्यात जोडी बनवली होती. ही जोडी यावर्षी विम्बल्डनपर्यंत कायम होती. यादरम्यान तीन ग्रँडस्लॅम स्पर्धेत विजेतेपद पटकावले; परंतु विम्बल्डननंतर या दोघींनी आपला वेगवेगळा मार्ग अवलंबला.
या दोन्ही खेळाडंूनी वर्षअखेरची ग्रँडस्लॅम यूएस ओपन आणि त्याआधी एका स्पर्धेत वेगवेगळ्या साथीदारांसह सहभाग नोंदवला होता. यूएस ओपनमध्ये या दोन्ही खेळाडूंना यश मिळाले नाही. सानिया उपांत्यपूर्व फेरीत, तर हिंगीस उपांत्य फेरीत पोहोचली होती. विशेष म्हणजे या दोघींनी गतवर्षी या स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते. सानियाचे ताज्या रँकिंगमध्ये ९७३० गुण आहेत आणि ती
दुहेरीत अव्वल स्थानी आहे; परंतु तिचे हिंगीसमधील अंतर फक्त ५ गुण राहिले आहे. रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या हिंगीसचे ९७२५ गुण आहेत. 

साकेत १३७व्या रँकिंगवर
अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रथमच स्थान मिळवणारा साकेत मिनेनी जाहीर झालेल्या एटीपीच्या विश्व रँकिंगमध्ये आपल्या सर्वोत्तम
१३७ व्या रँकिंगवर पोहोचला आहे. स्पेनविरुद्ध डेव्हिस चषक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा २८ वर्षीय मिनेनीने पात्रता फेरीत तीन सामने जिंकून अमेरिकन ओपनमध्ये मुख्य फेरीत प्रवेश मिळवला
होता. याचा त्याला सहा गुणांचा फायदा झाला.

Web Title: Sania, Hingis have only 5 points difference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.