सानिया-हिंगीस उपांत्य फेरीत; बोपन्ना-मर्जिया पराभूत

By Admin | Published: October 30, 2015 10:30 PM2015-10-30T22:30:07+5:302015-10-30T22:30:07+5:30

जागतिक टेनिसमधील अव्वल महिला जोडी सानिया मिर्झा - मार्टिना हिंगीस यांनी आपला धडाकेबाज खेळ कायम राखताना डब्ल्यूटीए फायनल्सच्या उपांत्य फेरीत धडक मारली

Sania-Hingis in semifinals Bopanna-Margia lose | सानिया-हिंगीस उपांत्य फेरीत; बोपन्ना-मर्जिया पराभूत

सानिया-हिंगीस उपांत्य फेरीत; बोपन्ना-मर्जिया पराभूत

googlenewsNext

सिंगापूर : जागतिक टेनिसमधील अव्वल महिला जोडी सानिया मिर्झा - मार्टिना हिंगीस यांनी आपला धडाकेबाज खेळ कायम राखताना डब्ल्यूटीए फायनल्सच्या उपांत्य फेरीत धडक मारली. विशेष म्हणजे सानिया - हिंगीस जोडीने सलग २० सामन्यात विजय मिळवण्याचा पराक्रम केला आहे.
संभाव्य विजेत्या मानल्या जात असलेल्या या अव्वल जोडीने स्पर्धेच्या सुरुवातीपासूनच आपल्या लौकिकानुसार खेळ करताना दणदणीत विजयांचा धडाका लावला. वेगवान व चपळतेने खेळताना या अव्वल जोडीने सर्वच प्रतिस्पर्ध्यांना आपला खेळ खेळण्याची फारशी संधी दिली नाही. उपांत्य सामन्यातही सानिया - हिंगीस जोडीने आपला धडाका कायम राखताना हंगेरीच्या टिमीया बाबोस आणि फ्रान्सच्या क्रिस्टीना मालडेनोविच यांचा सरळ दोन सेटमध्ये ६-४, ७-५ असा पाडाव केला.
पहिल्या सेटमध्ये निर्णायक क्षणी खेळ उंचावून बाजी मारल्यानंतर सानिया - हिंगीस यांना दुसऱ्या सेटमध्ये काहीसे झुंजावे लागले. यावेळी टिमीया - क्रिस्टीना यांनी अव्वल जोडीविरुध्द तोडीस तोड खेळ करुन सामना तिसऱ्या सेटमध्ये नेण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र अंतिम क्षणी अनुभवाच्या जोरावर बाजी मारताना सानिया - हिंगीस यांनी उपांत्य फेरीत आगेकूच केली. स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात सानिया - हिंगीस समोर चीनी तैपईच्या चान हाओ चिंग - चान यंग जान या तिसऱ्या मानांकीत जोडीविरुध्द लढावे लागेल. गतवर्षी झिम्बाब्वेच्या कॅरा ब्लॅकच्या साथीने खेळताना सानियाने डब्ल्यूटीए फायनल्समध्ये महिला दुहेरीचे विजेतेपद पटकावले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Sania-Hingis in semifinals Bopanna-Margia lose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.