सानिया-हिंगीस उपांत्य फेरीत; बोपन्ना-मर्जिया पराभूत

By Admin | Published: July 10, 2015 01:47 AM2015-07-10T01:47:23+5:302015-07-10T01:47:23+5:30

भारताची अव्वल टेनिस तारका सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी जबरदस्त कामगिरी करताना या वर्षातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन

Sania-Hingis in semifinals Bopanna-Margia lose | सानिया-हिंगीस उपांत्य फेरीत; बोपन्ना-मर्जिया पराभूत

सानिया-हिंगीस उपांत्य फेरीत; बोपन्ना-मर्जिया पराभूत

googlenewsNext

लंडन : भारताची अव्वल टेनिस तारका सानिया मिर्झा आणि तिची जोडीदार स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीस यांनी जबरदस्त कामगिरी करताना या वर्षातील तिसऱ्या ग्रँडस्लॅम विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. दरम्यान भारताचा दुहेरीतील आघाडीचा टेनिसपटू रोहन बोपन्ना याने रुमानियाच्या फ्लोरिन मर्जिया यांना पुरुष दुहेरीच्या उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागला.
स्पर्धेतील अव्वल मानांकित जोडी सानिया-हिंगीस यांनी आॅल इंग्लंड क्लबमध्ये नववी मानांकित आॅस्ट्रेलियाची कासी डेलाक्का आणि कझाकिस्तानची यारोस्लावा श्वेडोवा यांच्यावर १ तास १९ मिनिटांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत ७-५, ६-३ असा सलग सेटमध्ये विजय मिळवला.
सानिया-हिंगीस उपांत्य फेरीत अमेरिकेच्या राकेल कोप्स जोन्स आणि एबीगाली स्पीयर्स या पाचव्या मानांकित जोडीविरुद्ध खेळतील. सानियाने आपली अनुभवी जोडीदार आणि अनुभवी खेळाडू मार्टिना हिंगीस हिच्या साथीने जोरदार कामगिरी करताना सामन्यात एक़ूण ७२ गुण जिंकले. भारतीय-स्विस जोडीने पहिल्या सर्व्हिसवर ६९ टक्के गुण जिंकले आणि तिन्ही ब्रेक पाँइंटचे गुणांत रूपांतर केले. भारतीय खेळाडू सानिया मिर्झा हिने २०११मध्ये एलिना वेस्नीना हिच्या साथीने विम्बल्डनमध्ये उपांत्य फेरी गाठली होती. तर, तिची जोडीदार हिंगीसने १९९६ आणि १९९८ असे दोनदा महिला दुहेरीचे विजेतेपद मिळविले आहे.
दरम्यान, भारताचा स्टार रोहन बोपन्ना आणि रुमानियाचा फ्लोरिन मर्जिया या जोडीला दुहेरीच्या उपांत्य फेरीत नेदरलँडचा ज्युलियन रॉजर आणि रुमानियाचा होरिया टेकाऊ या जोडीकडून पाच सेटपर्यंत रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला. त्याचबरोबर त्यांचे अंतिम फेरीत पोहोचण्याचे स्वप्नही भंगले. ज्युलियन आणि होरिया या जोडीने ३ तास २३ मिनिटे रंगलेल्या रोमहर्षक उपांत्य फेरीत ४-६, ६-२, ६-३, ४-६, १३-११ असा विजय मिळविला. याआधीही बोपन्न २०१३मध्ये पाच सेटपर्यंत चाललेल्या मॅरेथॉन उपांत्य फेरीच्या लढतीत निसटता पराभव पत्करावा लागला होता. योगायोगाने त्या वेळी त्याचा जोडीदार ज्युलियन रॉजर होता. आज ज्युलियन रॉजरने होरियाच्या साथीने बोपन्ना व त्याच्या साथीदाराला पराभूत केले. अखेरचे दोन्ही सेंट धैर्याची परीक्षा घेणारे ठरले. दोघांनी २३ गेमपर्यंत आपली सर्व्हिस वाचवली. पाचव्या सेटच्या २४व्या गेममध्ये भारत-रुमानिया जोडीची सर्व्हिस भेदली गेली आणि त्याचबरोबर त्यांचा या स्पर्धेतील प्रवासही संपला.

Web Title: Sania-Hingis in semifinals Bopanna-Margia lose

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.