सानिया पद्मभूषणने सम्मानित
By admin | Published: April 13, 2016 02:35 AM2016-04-13T02:35:20+5:302016-04-13T02:35:20+5:30
भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंगळवारी भारतीय टेनिसस्टार आणि जगतिक महिला दुहेरीतील अव्वल खेळाडू सानिया मिर्झाचा प्रतिष्ठेचा पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला.
नवी दिल्ली : भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मंगळवारी भारतीय टेनिसस्टार आणि जगतिक महिला दुहेरीतील अव्वल खेळाडू सानिया मिर्झाचा प्रतिष्ठेचा पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला.
राष्ट्रपती भवनमध्ये झालेल्या या सोहळ्यामध्ये उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत क्रीडा, चित्रपट आणि इतर क्षेत्रांतील मान्यवरांना पद्मने सम्मानित करण्यात आले.
स्टार खेळाडू सानियाने गतवर्षी देशाचा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार राजीव गांधी खेलरत्नदेखील मिळवला होता. शिवाय २००६ मध्ये तिला पद्मश्रीनेही गौरविण्यात आले होते. याआधी २९ मार्चला राष्ट्रपती भवनमध्ये झालेल्या सोहळ्यात देशाची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि जागतिक क्रमवारीतील माजी अव्वल महिला तिरंदाज दीपिकाकुमारीलाही पद्मश्री पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)