सानियाकडे भारतीय संघाचे नेतृत्व

By admin | Published: December 22, 2015 02:59 AM2015-12-22T02:59:16+5:302015-12-22T02:59:16+5:30

पुढील वर्षी होणाऱ्या फेड कप टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघाची धुरा जागतिक महिला दुहेरीत अग्रस्थानी असलेल्या सानिया मिर्झाकडे सोपविण्यात आली आहे

Sania leads the Indian team | सानियाकडे भारतीय संघाचे नेतृत्व

सानियाकडे भारतीय संघाचे नेतृत्व

Next

नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या फेड कप टेनिस स्पर्धेसाठी भारतीय संघाची धुरा जागतिक महिला दुहेरीत अग्रस्थानी असलेल्या सानिया मिर्झाकडे सोपविण्यात आली आहे. आॅल इंडिया टेनिस असोसिशनच्या (एआयटीए) एस. पी. मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान थायलंडमध्ये होणाऱ्या फेड कपच्या आशिया-ओशियाना गटातील सामन्यांसाठी चार सदस्यांच्या भारतीय संघाची घोषणा केली.
थायलंड मधील हुआ हिन येथे होणाऱ्या फेड कप स्पर्धेची चुरस रंगणार आहे. सानिया मिर्झाच्या नेतृत्वाखालील निवडण्यात आलेल्या भारतीय संघात देशाची अव्वल महिला एकेरी खेळाडू अंकिता रैना, राष्ट्रीय विजेती प्रेरणा भांबरी आणि प्रार्थना ठोंबरे यांचा समावेश आहे.
त्याच वेळी करमन कौर थांडीला अतिरिक्त खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे. तसेच यावेळी निवडकर्त्यांनी फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या दक्षिण आशियाई स्पर्धेसाठीही प्रत्येकी सहा सदस्यांच्या पुरुष व महिला संघाची निवडक केली. (वृत्तसंस्था)

Web Title: Sania leads the Indian team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.