सानिया- मार्टिना दुसऱ्या फेरीत

By admin | Published: May 26, 2016 03:51 AM2016-05-26T03:51:09+5:302016-05-26T03:51:09+5:30

अग्रमानांकित सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीसच्या जोडीने दारिया कासासकिना व अलेक्सझॅँड्रा पानोव्हा या जोडीला पराभूत करत फ्रेंच ओपन टेनिसच्या महिला दुहेरी गटातील

Sania-Martina in second round | सानिया- मार्टिना दुसऱ्या फेरीत

सानिया- मार्टिना दुसऱ्या फेरीत

Next

पॅरीस : अग्रमानांकित सानिया मिर्झा व मार्टिना हिंगीसच्या जोडीने दारिया कासासकिना व अलेक्सझॅँड्रा पानोव्हा या जोडीला पराभूत करत फ्रेंच ओपन टेनिसच्या महिला दुहेरी गटातील दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
विम्बल्डन, अमेरिकन व आॅस्ट्रेलियन ओपन चॅम्पियन जोडी सानिया- मार्टिना या जोडीने ७-६,६-२ असा विजय संपादन केला. या जोडीला कॅलेंडर स्लॅम पूर्ण करण्यासाठी या स्पर्धेचे विजेतेपद पटकावणे गरजेचे आहे. दुसऱ्या फेरीत या जोडीचा सामना करीन नाप व मॅँडी मिनेला विरुद्ध नाओ हिबिनो व एरी होजोमी यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
सानिया - मार्टिनाला या सामन्या तीन वेळा आपली सर्व्हिस गमवावी लागली तर १२ ब्रेकपॉर्इंटचा सामना करावा लागला. मिश्र दुहेरीत सानिया इवान डोडिंग याच्याबरोबर तर बोपन्ना रशियाच्या आलिया कुद्रयावत्सेवा बरोबर खेळणार आहेत. लिएंडर पेस मार्टिना हिंगीस बरोबर खेळणार आहे. या जोडीने २०१५ मध्ये तीन ग्रॅँडस्लॅम जिंकले होते.

Web Title: Sania-Martina in second round

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.