सानिया मिर्झाची बहीण करणार क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 01:51 PM2019-10-07T13:51:37+5:302019-10-07T13:51:55+5:30

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला

Sania Mirza confirms her sister Anam is marrying Mohammad Azharuddin’s son Asad Azharuddin | सानिया मिर्झाची बहीण करणार क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न!

सानिया मिर्झाची बहीण करणार क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न!

googlenewsNext

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झानं पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकशी विवाह केला आणि या दाम्पत्याला 30 ऑक्टोबरला पुत्रप्राप्ती झाली आणि दोघांनी त्याचे नाव इझान मिर्झा मलिक असे ठेवले. सानिया आणि शोएब हे दाम्पत्य नेहमी चर्चेत राहिले आहे. आता सानियाची बहीण अनम मिर्झा क्रिकेटपटूच्या मुलाशी लग्न करणार आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा असद आणि अनम यांच्यात प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा आहेत आणि ही दोघं लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. असद आणि अनम यांना अनेकदा सार्वजनिक ठिकाणी एकत्र पाहिले गेले आहे. सानियाच्या त्यांच्या लग्नाच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

''येत्या डिसेंबर महिन्यात अनम लग्न करणार आहे. आम्ही नुकतेच पॅरीसमधून बॅचलर पार्टी करून परत आलो आहोत. तिच्या लग्नासाठी आम्ही सर्वच उत्सुक आहोत. ती मोहम्मद अझरुद्दीन यांचा मुलगा असदशी विवाह करणार आहे,'' असे सानियानं टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. पहिला पती अकबर रशीदकडून काडीमोड घेण्यासाठी अनमने गतवर्षी कोर्टात केस दाखल केली आहे. 18 नोव्हेंबर 2016 मध्ये तिचा आणि हैदराबादचा उद्योगपती अकबर यांचा विवाह झाला होता. 

विराट कोहलीच्या अपयशाला अनुष्का जबाबदार कशी? सानिया मिर्झा संतापली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या अपयशाला नेटिझन्सकडून बॉलिवूड अभिनेत्री अनुष्कालाच जबाबदार धरले जाते. नेटिझन्सच्या याच दृष्टीकोनावर टेनिसस्टार सानिया मिर्झा चांगलीच भडकली आहे. विराटच्या अपयशाला अनुष्काला जबाबदार धरणे, याला काहीच अर्थ नाही, असे सानिया म्हणाली.

India Economic Summit मध्ये ती म्हणाली की,''विराट कोहली शून्यावर बाद झाला, तर अनुष्का शर्मावर टीका होते. या गोष्टीचा एकमेकांशी काही संदर्भ आहे का? या टीकेमागे काहीच तर्क नाही. आपल्या भारतीय क्रिकेट संघासह दौऱ्यावर असताना अनेकदा त्यांच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंड्सना सोबत नसतात. कारण, की खेळाडूंचे लक्ष विचलित होईल. यामागेही काय अर्थ आहे, हे कळले नाही. महिला पुरुषांचे लक्ष विचलित करतात, असे म्हणायचं आहे का?''  

Web Title: Sania Mirza confirms her sister Anam is marrying Mohammad Azharuddin’s son Asad Azharuddin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.