फुकट तिकीट मागणारी सानिया मिर्झा होतेय ट्रोल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2018 02:12 PM2018-06-04T14:12:00+5:302018-06-04T14:12:00+5:30
भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्रीकडे सानियाने समाजमाध्यमावर फुकट तिकीट मागितली होती. त्यानंतर लोकांनी ट्विटरवर सानियाला ट्रोल करत तिच्यावक सडकून टीका केली आहे.
नवी दिल्ली : एका फुटबॉल सामन्यासाठी फुकट तिकीट मागणारी टेनिसपटू सानिया मिर्झा सध्याच्या घडीला ट्रोल होताना दिसत आहे. भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्रीकडे सानियाने समाजमाध्यमावर फुकट तिकीट मागितली होती. त्यानंतर लोकांनी ट्विटरवर सानियाला ट्रोल करत तिच्यावक सडकून टीका केली आहे.
फुटबॉल या खेळाला भारतामध्ये चांगली पसंती मिळत आहे. त्यामुळे भारताचा फुटबॉलपटू सुनील छेत्रीने चाहत्यांना ट्विटरवर एक आवाहन केले होते. या आवाहनामध्ये तो म्हणला होता की, " तुम्ही सारे मेस्सी, रोनाल्डो, नेयमार यांचे सामने रात्र जागून पाहता. त्यामुळे तुम्ही भारताच्या संघाला मैदानात येऊन पाठिंबा देऊ शकता. त्यामुळे मोठ्या संख्येने सामना पाहायला या."
This is nothing but a small plea from me to you. Take out a little time and give me a listen. pic.twitter.com/fcOA3qPH8i
— Sunil Chhetri (@chetrisunil11) June 2, 2018
ट्विटरवर छेत्रीने केलेले हे आवाहन सानियाने पाहिले. सानियाने छेत्रीच्या ट्विटच्या खाली लिहिले की, " मला या सामन्याची तिकीटे देशील का? " या सानियाच्या पोस्टनंतर तिच्यावर लोकांनी कडक शब्दांत टीका केली आहे. एका चाहत्याने तर टीका करताना म्हटले आहे की, " सानिया तू पाकिस्तानमध्ये एवढी व्यस्त आहेस की तुला भारताचे सामना बघण्यासाठी वेळ मिळेल का? "