Sania Mirza in Australian Open: सानिया मिर्झाचं ऑस्ट्रेलियन ओपनमधील आव्हान संपुष्टात; राजीव रामसोबत मिश्र दुहेरीमध्ये झाली पराभूत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 01:46 PM2022-01-25T13:46:41+5:302022-01-25T13:49:19+5:30
ऑस्ट्रेलियन ओपनमधील महिला दुहेरीतील पराभवानंतरच सानियाने निवृत्तीची घोषणा केली होती.
Sania Mirza: ऑस्ट्रेलियन ओपन २०२२ मध्ये सानिया मिर्झाचे आव्हान संपुष्टात आले. राजीव रामसोबत मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत तिला पराभवाचा सामना करावा लागला. सानिया मिर्झा आणि राजीव राम यांना जेसन कुबलर आणि जेमी फोर्लिस या ऑस्ट्रेलियन जोडीने सरळ सेटमध्ये ६-४, ७-६ (७-५) असं पराभूत केले. हा सामना सुमारे दीड तास चालला. या पराभवासह सानिया मिर्झा ऑस्ट्रेलियन ओपनमधून बाहेर झाली.
Thank you for the memories, @MirzaSania ❤️
— #AusOpen (@AustralianOpen) January 25, 2022
The two-time #AusOpen doubles champion has played her final match in Melbourne.#AO2022pic.twitter.com/YdgH9CsnF0
महिला दुहेरीत तिला पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला होता. तिच्या कारकिर्दीतील हा शेवटचा ऑस्ट्रेलियन ओपनचा सामना होता. सानिया मिर्झाने नुकतेच जाहीर केले होते की, हा तिच्या टेनिस कारकिर्दीचा शेवटचा हंगाम असेल.
🎾 2016 women's doubles 🏆
— #AusOpen (@AustralianOpen) January 20, 2022
🎾 2009 mixed doubles 🏆
We wish two-time #AusOpen champion 🇮🇳 @MirzaSania the very best as she confirms 2022 will be her last season on tour ❤️ #AO2022pic.twitter.com/2SAmox7bRN
उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सानिया आणि राजीव या जोडीची सर्व्हिस दोनदा ब्रेक झाली. अशा स्थितीत कुबलर आणि फोर्लिस या ऑस्ट्रेलियन जोडीने पहिला सेट सहज जिंकला. दुसऱ्या सेटमध्ये सानिया-राजीव जोडीने झुंज देत सेट टायब्रेकरपर्यंत खेचला. पण टायब्रेकरमध्ये ऑस्ट्रेलियन जोडीनेच बाजी मारली. त्यामुले सानिया मिर्झाचे ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये विजेतेपद पटकावण्याचे स्वप्न अपूर्णच राहिलं.