मिश्र दुहेरीत सानिया विजयी

By admin | Published: July 10, 2017 01:16 AM2017-07-10T01:16:29+5:302017-07-10T01:16:29+5:30

भारताची टेनिस तारका सानिया मिर्झाने येथे विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत तिसरी फेरी गाठली.

Sania wins in mixed doubles | मिश्र दुहेरीत सानिया विजयी

मिश्र दुहेरीत सानिया विजयी

Next

लंडन : भारताची टेनिस तारका सानिया मिर्झाने येथे विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या मिश्र दुहेरीत तिसरी फेरी गाठली.
सानिया मिर्झा आणि क्रोएशियाच्या इव्हान डोडिग या चौथ्या मानांकित जोडीने मिश्र दुहेरीत युसुके वातानुकी आणि मकोतो निमोमिया या जपानच्या जोडीचा १ तास १८ मिनिटे रंगलेल्या लढतीत ७-६, ६-२ असा पराभव करताना तिसरी फेरी गाठली.
भारत आणि क्रोएशियाच्या जोडीने दुसऱ्या फेरीच्या लढतीत सहा वेळेस बिनतोड सर्व्हिस केली तर चार वेळेस दुहेरी चुकाही केल्या. या जोडीला उपांत्यपूर्व फेरी गाठण्यासाठी आता गत चॅम्पियन हेन्री कोंटीनेन आणि हीथर वॉटसन यांच्याशी दोन हात करावे लागेल. तत्पूर्वी, महिला दुहेरीतही सानिया आणि बेल्जियमची तिची जोडीदार कर्स्टन फ्लिपकेन्स जोडीने नाअ‍ेमी ब्रॉडी आणि हीथर वॉटसन या ब्रिटनच्या जोडीचा पराभव करताना तिसरी फेरी गाठली. या जोडीने एक तास आणि ४५ मिनिटांच्या लढतीत प्रतिस्पर्ध्यांवर ६-३, ३-६, ६-४ अशी मात केली. या जोडीची तिसऱ्या फेरीत स्वित्झर्लंडच्या मार्टिना हिंगीस आणि तैपईच्या युंग यान चेन या तृतीय मानांकित जोडीविरुद्ध गाठ पडेल.
मिश्र दुहेरीत पूवने जपानच्या एरि होजुमीबरोबर पहिल्या फेरीत जेम्स कारेटानी आणि रेनाटा वोराकावा या अमेरिका आणि झेक प्रजासत्ताकच्या जोडीचा ५-७, ६-४, ६-२ असा पराभव केला. (वृत्तसंस्था)

Web Title: Sania wins in mixed doubles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.