सानियाच्या पदरी निराशा, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपविजेतेपद

By admin | Published: January 29, 2017 11:46 AM2017-01-29T11:46:14+5:302017-01-29T12:06:23+5:30

भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झा आणि तिचा क्रोएशियाचा सहकारी इवान डोडिग यांचा आॉस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पराभव

Sania's career disappointment, the runner-up in the Australian Open | सानियाच्या पदरी निराशा, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपविजेतेपद

सानियाच्या पदरी निराशा, ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये उपविजेतेपद

Next

ऑनलाइन लोकमत

मेलबोर्न, दि. 29 - ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम सामन्यात भारताची टेनिस स्टार सानिया मिर्झाच्या पदरी निराशा पडली आहे. सानिया आणि तिचा क्रोएशियाचा सहकारी इवान डोडिग या  दुसऱ्या मानांकित  जोडीला आॉस्ट्रेलियन ओपनच्या मिश्र दुहेरीच्या अंतिम सामन्यात पराभवाचा धक्का बसला. अमेरिकेच्या एबिगेल स्पियर्स व कोलंबियाच्या युआन सबेस्टियन कबाल या बिगरमानांकित जोडीने त्यांचा सरळ सेटमध्ये  6-2, 6-4 असा पराभव केला.

सामन्याच्या सुरूवातीपासूनच  स्पियर्स आणि कबाल जोडीने आक्रमक खेळ केला आणि सानिया-डोडिग जोडीला लय मिळवणं कठीण गेलं. केवळ 26 मिनिटात सानिया-डोडीग जोडीने पहिला सेट 6-2 असा गमावला. दुस-या सेटमध्ये दोघांनी आक्रमक खेळण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्पियर्स आणि कबाल जोडीने वर्चस्व गाजवत 6-4 असा दुसरा सेट जिंकला आणि ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावलं. 

सानिया व डोडिगने गेल्या वर्षीही फ्रेंच ओपनच्या अंतिम फेरीत धडक मारली होती, पण लिएंडर पेस व मार्टिना हिंगीस यांच्याविरुद्ध त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता.

सानियाने पाचव्यांदा आॅस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. 2008 मध्ये महेश भूपतीच्या साथीने तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, तर त्यानंतरच्या वर्षी या जोडीने जेतेपद पटकावले होते. २०१४ मध्ये होरिया तेकाऊच्या साथीने सानिया उपविजेती ठरली होती. यंदाही सानियाला उपविजेतेपदावरच समाधान मानावं लागलं आहे.

Web Title: Sania's career disappointment, the runner-up in the Australian Open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.