संजय प्रजापती ठरला ‘नवोदित मुंबई श्री’
By admin | Published: November 13, 2016 02:21 AM2016-11-13T02:21:15+5:302016-11-13T02:21:15+5:30
मध्यरात्री दोनपर्यंत रंगलेल्या अत्यंत रोमांचक लढतीत गुरुदत्त जिमच्या संजय प्रजापती याने बाजी मारत नवोदित मुंबई श्री किताबावर कब्जा केला. तसेच, यंदा प्रथमच
मुंबई : मध्यरात्री दोनपर्यंत रंगलेल्या अत्यंत रोमांचक लढतीत गुरुदत्त जिमच्या संजय प्रजापती याने बाजी मारत नवोदित मुंबई श्री किताबावर कब्जा केला. तसेच, यंदा प्रथमच झालेल्या आकर्षक अशा फिजीक फिटनेस प्रकारामध्ये आर. के. फिटनेसच्या रोहन कदमने बाजी मारली.
मुंबई उपनगर शरीरसौष्ठव आणि फिटनेस संघटना (एमएसबीबीएफए) आणि बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने दादर येथील शिवाजी मंदिरमध्ये झालेल्या रंगतदार स्पर्धेत विविध गटांतून २७३ शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या पीळदार शरीराचे प्रदर्शन केले. संदेश सकपाळ (५५ किलो), विराज लाड (६०), तेजस भालेकर (६५), सलीम सय्यद (७०), संजय प्रजापती (७५) आणि शिवा बिराजदार (७५+) यांनी आपआपल्या वजनी गटात बाजी मारुन चमकदार कामगिरी केली. परंतु, अंतिम फेरीत संजय प्रजापतीने जबरदस्त वर्चस्व राखताना स्पर्धेचा किताब पटकावला. (क्रीडा प्रतिनिधी)