संजीव नायरचा धक्कादायक विजय

By admin | Published: December 30, 2016 01:38 AM2016-12-30T01:38:02+5:302016-12-30T01:38:02+5:30

मुंबईकर युवा बुध्दिबळपटू संजीव नायरने (इलो १८९९) याने मुंबई आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी इजिप्तचा ग्रँडमास्टर हेशाम अब्दलरहमान

Sanjiv Nayar's shocking victory | संजीव नायरचा धक्कादायक विजय

संजीव नायरचा धक्कादायक विजय

Next

मुंबई : मुंबईकर युवा बुध्दिबळपटू संजीव नायरने (इलो १८९९) याने मुंबई आंतरराष्ट्रीय बुध्दिबळ स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी इजिप्तचा ग्रँडमास्टर हेशाम अब्दलरहमान (इलो २४०८) याला धक्का देत खळबळ माजवली. तसेच अन्य एका लढतीत बिहारचा ग्रँडमास्टर सौरभ आनंदने अर्मेनियाचा सहावा मानांकीत ग्रँडमास्टर कारेन मोवस्झस्झीयनला पराभूत केले.
बीकेसी येथील माऊंट लिटेरा इंटरनॅशनल स्कूलमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत १९ वर्षीय संजीवने सफेद मोहऱ्यांनी खेळताना लक्षवेधी कामगिरी केली.
हेशामने सिसिलियन नाजडोर्फ पध्दतीने खेळताना चांगली सुरुवात केली. परंतु, संजीवने देखील त्याला तोडिस तोड उत्तर देताना चांगले नियंत्रण राखले. हेशामने काही ठिकाणी केलेल्या माफक चुकांचा अचूक फायदा उचलताना संजीवने बोर्डवर वर्चस्व मिळवले.
यानंतर संजीवने जोरदर हल्ले करताना त्याने हेशामला दबावाखाली आणत त्याला पराभव मान्य करण्यास भाग पाडले.
विशेष म्हणजे संजीव पहिल्यांदाच एखाद्या ग्रँडमास्टरविरुध्द खेळत होता. दुसरीकडे ग्रँडमास्टर सौरभने देखील चमकदार बाजी मारताना शानदार आगेकूच केली.
९ वर्षाखालील माजी राष्ट्रीय विजेता असलेल्या सौरभने अनुभवी ग्रँडमास्टर कारेनला ४१ चालींमध्ये पराभवाचा धक्का दिला.
सावध सुरुवातीनंतर मोक्याच्यावेळी हल्ले करतान सौरभने कारेनच्या राजाला जेरीस आणले. अन्य एका लढतीत भारताचे आशास्थान ग्रँडमास्टर दिपतयान घोषला पुण्याच्या निखिल दिक्षितविरुध्द बरोबरीवर समाधान मानावे लागले. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Sanjiv Nayar's shocking victory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.