सरफराजचा विश्वविक्रम
By Admin | Published: February 16, 2016 03:27 AM2016-02-16T03:27:53+5:302016-02-16T03:27:53+5:30
नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, भारताकडून सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या उदयोन्मुख फलंदाज सरफराज खान याने
मीरपूर : नुकत्याच झालेल्या १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत, भारताकडून सातत्यपूर्ण कामगिरी केलेल्या उदयोन्मुख फलंदाज सरफराज खान याने, स्पर्धेत तब्बल ७ अर्धशतके झळकावताना जागतिक विक्रमाला गवसणी घातली आहे.
अंतिम सामन्यात इतर फलंदाज एकामागून एक गारद
होत असताना, धडाकेबाज
सरफराजने एकाकी झुंज
देत ५१ धावांची खेळी केली. विशेष म्हणजे, याजोरावर सरफराजने युवा विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतक झळकावण्याचा मान मिळवला. स्पर्धा इतिहासात त्याने एकूण १२ सामने खेळताना, १२ डावांमध्ये सात अर्धशतक ठोकले. यातील ५ अर्धशतके त्याने यंदाच्या स्पर्धेत झळकावली असून, २ अर्धशतके २०१४ साली झळकावली.
अंतिम सामन्यात अर्धशतक ठोकताना सरफराजने वेस्ट इंडिजच्या क्रेग ब्रेथवेटचा रेकॉर्ड मोडला. ब्रेथवेटने २०१२ साली झालेल्या युवा विश्वचषक स्पर्धेत सहा अर्धशतके साजरी केली होती. तसेच १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सरफराज तिसऱ्या स्थानी असून, त्याने १२ सामन्यांत ५६६ धावा काढल्या आहेत.