सर्फराज अहमद पाकिस्तान टी-२० चा नवा कर्णधार
By admin | Published: April 6, 2016 04:34 AM2016-04-06T04:34:23+5:302016-04-06T04:34:23+5:30
यष्टिरक्षक, फलंदाज सर्फराज अहमदची आज पाकिस्तानच्या टी-२० संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. सर्फराजने शाहीद आफ्रिदीची जागा घेतली आहे.
लाहोर : यष्टिरक्षक, फलंदाज सर्फराज अहमदची आज पाकिस्तानच्या टी-२० संघाचा नवा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. सर्फराजने शाहीद आफ्रिदीची जागा घेतली आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने म्हटले आहे, की पीसीबीला ही घोषणा करताना आनंद होत आहे, की सर्फराज अहमद टी-२० संघाचा नवीन कर्णधार आहे. सर्फराजला मागच्या वर्षी एकदिवसीय आणि टी-२० संघाचा उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले होते. तो शाहीद आफ्रिदीची जागा घेईल. आफ्रिदीचा कार्यकाळ टी-२० विश्वचषकानंतर संपला आहे.
पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान म्हणाले, की अहमदची निवड ही स्वाभाविक होती. मी सर्फराजला भविष्यासाठी शुभेच्छा देतो.
उपकर्णधार असलेल्या सर्फराजने संघाचे कर्णधारपद कठीण काळात स्वीकारले आहे. टी-२० विश्वचषकात संघाचे प्रदर्शन खराब राहिले. साखळी फेरीत चारपैकी तीन सामने संघाने गमावले. (वृत्तसंस्था)