सरिता, पिंकीचे पुनरागमन

By admin | Published: May 29, 2017 12:27 AM2017-05-29T00:27:37+5:302017-05-29T00:27:37+5:30

व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये सहभाग घेतल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा कमी वेळेत माजी वर्ल्डचॅम्पियन एल. सरितादेवी आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कास्यपदक

Sarita, Pinky's comeback | सरिता, पिंकीचे पुनरागमन

सरिता, पिंकीचे पुनरागमन

Next

नवी दिल्ली : व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये सहभाग घेतल्यानंतर सहा महिन्यांपेक्षा कमी वेळेत माजी वर्ल्डचॅम्पियन एल. सरितादेवी आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कास्यपदक जिंकणाऱ्या पिंकी जांगडा यांनी राष्ट्रीय महासंघाची माफी मागताना अमॅच्युर बॉक्सिंगमध्ये पुनरागमन केले आहे.
भारतीय बॉक्सिंग परिषदेशी (आयबीसी) करार करणाऱ्या या दोन्ही महिला मुष्टीयोद्ध्यांनी भारतीय बॉक्सिंग महासंघाला (बीएफआय) माफी पत्र सोपवले असून त्या पुन्हा राष्ट्रीय शिबिरात सहभागी होणार आहेत.
बीएफआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले, ‘‘पिंकी उद्यापासून शिबिरात सहभागी होणार आहे, तर काही वैयक्तिक मुद्दे सुटल्यानंतर सरितादेखील लवकरच शिबिरात सहभागी होईल. या दोन्ही खेळाडूंनी माफी मागितली आहे. सरिताने व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये जाताना आमच्याशी सल्लामसलत केली नव्हती, तर पिंकीने परवानगी न घेता शिबीर सोडले होते.’’
सरिताने २९ जानेवारीला आपली प्रारंभीची व्यावसयिक लढत जिंकल्यानंतर एकही लढत खेळली नाही आणि सध्या ती मुंबई येथे तिच्या आईजवळ आहे. पुढील काही दिवसांत ती शिबिरात सहभागी होईल.
सरिताजवळील सूत्रांनी सांगितले, ‘‘सरिता आपल्या आईच्या आरोग्याविषयी व्यस्त आहे व ती लवकरच शिबिरात सहभागी
होईल. तिने बीएफआयचे अध्यक्ष अजयसिंह यांच्याशीही चर्चा केली असून, चर्चेनंतर त्यांनी तिचे खूप समर्थन केले.’’
(वृत्तसंस्था)

व्यावसायिक सर्किटमध्ये सहभागी झाल्यानंतर हौशी गटात पुनरागमन करण्यासाठी मी उत्सुक आहे. मी व्यावसायिक सर्किटमध्ये हात अजमावू इच्छित होते जे की मे केले. हे माझ्या मजबुती आणि ताकदीत वाढ होण्यासाठी होते. याशिवाय आपल्या पदार्पण लढतीनंतर आपण एकही लढत खेळलो नाही. त्यामुळे मी महासंघाला मला पुन्हा वापस घेण्यास आग्रह केला आणि ते सहमत झाले. परवानगी न घेता शिबीर सोडल्याबद्दल मी बीएफआयची माफी मागितली आहे. - पिंकी जांगडा, बॉक्सर

Web Title: Sarita, Pinky's comeback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.