सरिताने सचिनचे मानले आभार
By admin | Published: January 16, 2015 04:21 AM2015-01-16T04:21:03+5:302015-01-16T04:21:03+5:30
आशियाई क्रीडास्पर्धेत बक्षीस समारंभात भावनावीवश होऊन विरोध दर्शविणारी रौप्यपदकविजेती महिला मुष्टियोद्धा एल. सरिता देवीला पाठिंबा देणारा माजी
मुंबई : आशियाई क्रीडास्पर्धेत बक्षीस समारंभात भावनावीवश होऊन विरोध दर्शविणारी रौप्यपदकविजेती महिला मुष्टियोद्धा एल. सरिता देवीला पाठिंबा देणारा माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने आज भेट घेऊन तिच्याशी चर्चा केली.
तेंडुलकरने टिष्ट्वटरवरून ही माहिती देताना म्हटले आहे, की ‘सरिता देवीला मी भेटलो. तिच्या डोळ्यांत खेळण्याविषयीची आतुरता पाहिली.’ त्याचबरोबर तिच्या यशाविषयी एक संदेशही लिहिला, की ‘खेळाचा आनंद घे आणि सतत सर्वोत्कृष्ट कामगिरी कर.’ तेंडुलकर आपल्या घरी सरिताला भेटला शिवाय त्याने टिष्ट्वटरवरही या मुलाखतीचा फोटो अपलोड केला. शिवाय, या वेळी तेंडुलकरने हस्ताक्षर केलेला टी-शर्टही सरिताला भेट दिला.
या मुलाखतीबाबत सरिताने वृत्तसंस्थेला सांगितले, की मी सचिन यांनी दिलेल्या समर्थनाची आभारी आहे. माझ्याबरोबर ते राहिल्याने त्यांचे आभार मानण्यासाठी त्यांना भेटले. सरिताने आशियाई क्रीडास्पर्धेत वादातील उपांत्यफेरीच्या सामन्यात पराभूत झाल्यानंतर कांस्यपदक घेण्यास नकार दिला होता. त्यामुळे तिच्यावर आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धा संघाने दंडात्मक कारवाई केली होती. (क्रीडा प्रतिनिधी)