भारताचा 58 वर्षांचा दुष्काळ संपला; आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये स्टार जोडीची 'सुवर्ण' कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 09:37 PM2023-04-30T21:37:36+5:302023-04-30T21:38:19+5:30

सात्विक साईराज आणि चिराग शेट्टीने आज 58 वर्षानंतर भारतासाठी सुवर्णपदक पटकावले.

Satwiksairaj Rankireddy-Chirag Shetty: India Won Gold In Asian Badminton Championship | भारताचा 58 वर्षांचा दुष्काळ संपला; आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये स्टार जोडीची 'सुवर्ण' कामगिरी

भारताचा 58 वर्षांचा दुष्काळ संपला; आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये स्टार जोडीची 'सुवर्ण' कामगिरी

googlenewsNext

Satwiksairaj Rankireddy-Chirag Shetty:  एकीकडे भारतात IPLची धूम सुरू आहे, तर दुसरीकडे भारताच्या दोन खेळाडूंनी दैदिप्यमान कामगिरी करत भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने बॅडमिंटन कोर्टवर तिरंगा फडकवला आहे. त्या दोघांनी ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 58 वर्षांनंतर भारताला सुवर्ण पदक जिंकून दिले आहे.

सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने रविवारी 58 वर्षांचा दुष्काळ संपवला. दुबईतील आशिया बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये या दोघांनी सुवर्णपदकाची कामगिरी केली. यापूर्वी दिनेश खन्ना याने हा मान मिळवला होता. त्याने 1965 मध्ये लखनौ येथे पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात थायलंडच्या सांगोब रत्नुसोर्नचा पराभव करून ही कामगिरी केली होती. दरम्यान, 2022 वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या कांस्यपदक विजेत्यांनी उत्कंठापूर्ण फायनलमध्ये ओंग येव सिन आणि तेओ यी यी या मलेशियाच्या जोडीला 21-16, 17-21, 19-21 अशा फरकाने पराभूत केले. 

58 वर्षांचा दुष्काळ संपला
सामन्यात पिछाडीवर पडल्यानंतर सात्विक आणि चिरागने जबरदस्त पुनरागमन करत भारताला 58 वर्षांनंतर आशिया चॅम्पियन बनवले. आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावणारी ही पहिली भारतीय जोडी ठरली आहे. गतवर्षी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक जिंकणाऱ्या या भारतीय जोडीसमोर अंतिम फेरीत मलेशियाच्या ओंग यू सिन आणि तेओ ई यी ही जोडी होती. 

Web Title: Satwiksairaj Rankireddy-Chirag Shetty: India Won Gold In Asian Badminton Championship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.