एएफसी चॅम्पियन्स लीगमधून सौदी अरब, इराण क्लबची माघार

By Admin | Published: June 7, 2017 12:39 AM2017-06-07T00:39:46+5:302017-06-07T00:39:46+5:30

दहशतवादी कृत्यांना चिथावणी देणाऱ्या गटांना पाठिंबा देत असल्याचा आरोप असलेल्या कतारवर अनेक आखाती देशांनी बहिष्कार घातल्याने वाद विकोपाला गेला

Saudi Arabian withdrawal from AFC Champions League, Iran club withdrawal | एएफसी चॅम्पियन्स लीगमधून सौदी अरब, इराण क्लबची माघार

एएफसी चॅम्पियन्स लीगमधून सौदी अरब, इराण क्लबची माघार

googlenewsNext

क्वालालम्पूर : दहशतवादी कृत्यांना चिथावणी देणाऱ्या गटांना पाठिंबा देत असल्याचा आरोप असलेल्या कतारवर अनेक आखाती देशांनी बहिष्कार घातल्याने वाद विकोपाला गेला आहे.
याचा फटका क्रीडा क्षेत्रालादेखील बसला असून इराणमधील पर्सेपोलिस क्लब आणि सौदी अरबच्या अल अहली क्लबने कतारमध्ये आयोजित आशियाई चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व लढतीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला. सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, बहरिन, इजिप्त आणि येमेन यांनी कतारसोबतचे संबंध मोडीत काढले. या वादामुळे कतारच्या विमानांना या देशाच्या हवाईहद्दीतून प्रवेशास मज्जाव करण्यात आला. याचा अर्थ असा की आॅगस्टमध्ये होणाऱ्या सामन्यांसाठी या दोन्ही संघांना नव्या स्थळांचा शोध घ्यावा लागेल.
(वृत्तसंस्था)
एएफसी महासचिव विंडस्न जॉन म्हणाले, ‘इराणने ओमानला तटस्थ स्थळ म्हणून पसंती दर्शविली. सौदी अरबने कतारला पसंती दर्शविली होती. पण नव्या घटनाक्रमामुळे सौदी अरब देखील नवे तटस्थ स्थळ शोधणार आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Saudi Arabian withdrawal from AFC Champions League, Iran club withdrawal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.