आॅल इंग्लंड स्पर्धेपूर्वी लय सापडेल : सौरभ
By admin | Published: February 10, 2017 02:18 AM2017-02-10T02:18:49+5:302017-02-10T02:18:49+5:30
आॅल इंग्लड बॅडमिंटन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूंशी लढावे लागणार असल्याने या स्पर्धेपुर्वी सर्वश्रेष्ट लयीत येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे भारतीय बॅडमिंटनपटू सौरभ वर्मा याने सांगितले.
नवी दिल्ली : आॅल इंग्लड बॅडमिंटन स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूंशी लढावे लागणार असल्याने या स्पर्धेपुर्वी सर्वश्रेष्ट लयीत येण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे भारतीय बॅडमिंटनपटू सौरभ वर्मा याने सांगितले.
सौरभ म्हणाला, ‘मी दुसरा राष्ट्रीय किताब जिंकल्यामुळे खूप आनंदी आहे. हा आठवडा माझ्यासाठी खूपच चांगला होता. मी एकाग्रता राखून चांगली कामगिरी करु शकलो. मी चांगल्या रणनितीसह मैदानात उतरल्यामुळे हे शक्य झाले आहे’ राष्ट्रीय स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यासाठी मध्यप्रदेशच्या या खेळाडूला जास्त कष्ट पडले नाहीत. स्पर्धेतील कोणताही सामना तीन गेमपर्यंत गेला नाही.
दुखापतीनंतर पुनरागमन करत सौरभने बेल्जियम, पोलंड व बियबर्गर ओपन स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले तर चीनी ताईपे ग्रां.प्रीमध्ये त्याने सुवर्णपदक पटकावले. सौरभ म्हणाला,‘ मी सध्या तंदुरुस्त असून चांगल्या फॉर्ममध्ये आहे. मात्र मला सर्व बाजूंवर काम करावे लागणार आहे. अगामी स्पर्धेसाठी उच्चस्तरीय सराव करावा लागणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा वेगळ्या असतात व यासाठी मला कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे.’ (वृत्तसंस्था)