भरत अरुणच्या नियुक्तीवर सौरव गांगुलीने बाळगले मौन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:33 PM2017-07-19T14:33:37+5:302017-07-19T15:42:27+5:30
भरत अरुण यांच्या करण्यात आलेल्या निवडीबाबत प्रतिक्रिया विचारली असता सौरव गांगुलीने मौन पाळणे पसंत केले
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 19 - सौरव गांगुली आणि रवी शास्त्रीमध्ये सुरू असलेल्या शितयुद्धात रवी शास्त्रीने आणलेल्या दबावासमोर झुकत बीसीसीआयने काल भरत अरुण यांची संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी वर्णी लावली होती. भरत अरुण यांच्या करण्यात आलेल्या निवडीबाबत प्रतिक्रिया विचारली असता सौरव गांगुलीने मौन पाळणे पसंत केले.
सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मण यांच्या त्रिसदस्यीय क्रिकेट सल्लागार समितीने केलेली शिफारस डावलून बीसीसीआयने भरत अरुण यांना गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून नेमले होते. भरत अरुण यांना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा पाठिंबा होता. दरम्यान गांगुलीकडे याबाबत विचारणा करण्यात आली असता तो म्हणाला, "याविषयी बरेच काही बोलून झाले आहे. आता मला याविषयी अजून काही बोलायचे नाही."
काही दिवसांपूर्वी क्रिकेट सल्लागार समितीने रवी शास्त्री यांची भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक, झहीर खानला गोलंदाजी प्रशिक्षक आणि राहुल द्रविडला फलंदाजी प्रशिक्षक बनवण्याची शिफारस केली होती. त्यानंतर झहीर खान वर्षातील 150 दिवस भारतीय संघाला मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले होते. पण बीसीसीआयने या दोघांच्याही नियुक्तीला स्थगिती दिली होती. भरताच्या या दोन माजी क्रिकेटपटूंच्या भवितव्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याचे बीसीसीआय सचिव अमिताभ चौधरी यांनी सांगितले होते. अधिक वाचा
(रवी शास्त्रींचा दबदबा ! भरत अरूण टीम इंडियाचे नवे बॉलिंग कोच )
(हा तर द्रविड आणि झहीरचा सार्वजनिक अपमान - रामचंद्र गुहा )
( झहीरसोबत वर्षाकाठी १५० दिवसांचा करार - गांगुली )
नवनियुक्त मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची मागणी मान्य करताना बीसीसीआयने मंगळवारी भरत अरुण यांची भारतीय क्रिकेट संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती जाहीर केली होती. त्यामुळे या पदाबाबत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. शास्त्री भारतीय संघाचे संचालक होते त्या वेळी अरुण गोलंदाजी प्रशिक्षक होते. त्यांनी लवकरच सुरू होत असलेल्या दुसऱ्या कार्यकाळासाठी अरुण यांच्याकडे ही जबाबदारी सोपविण्याचा आग्रह धरला होता.

अरुण यांना दोन वर्षांसाठी करारबद्ध करण्याचा निर्णय शास्त्री यांच्या प्रशासकांची समिती (सीओए) तसेच काळजीवाहू अध्यक्ष सी. के. खन्ना आणि सचिव अमिताभ चौधरी यांच्यासह बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांसोबतच्या मुलाखतीनंतर घेण्यात आला.