सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाला कांस्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 02:01 AM2018-11-14T02:01:49+5:302018-11-14T02:02:28+5:30
पश्चिम विभागीय महिला हॉकी : अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेसाठी पात्र
पुणे : अखिल भारतीय आंतरविद्यापीठ अंतर्गत आयोजित आंतरविद्यापीठ पश्चिम विभागीय महिला हॉकी स्पर्धेत सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठ संघाने साखळी स्पर्धेत चारपैकी दोन सामने जिंकून तृतीय क्रमांक संपादन केला. ग्वाल्हेर येथील एनएनआयसी विद्यापीठच्या वतीने त्यांच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत सावित्रीबाई फुलेपुणे विद्यापीठ संघाने साखळीत प्रथम संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ संघाचा ५-० गोलने पराभव केला. विजयी संघाकडून फैजिया शेखने १३ व ४५ मिनिटाला असे दोन गोल केले. तिला भावना खाडेने चौथ्या मिनिटाला, कर्णधार शहाना शेखने १४व्या व श्रद्धा तिवारीने २६व्या मिनिटाला प्रत्येकी एक गोल केला.
दुसऱ्या सामन्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाने भोपाळ विद्यापीठ संघाला २-१ गोलने नमविले. विजयी संघाकडून भावना खाडेने चौथ्या तर श्रद्धा तिवारीने १४ व्या मिनिटाला गोल केला. तिसºया व चौथ्या सामन्यात मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघाला ग्वालियर विद्यापीठ संघाकडून दोन, तर एनएनआयपी विद्यापीठाकडून दोन गोलने पराभव पत्करावा लागला. या संघाबरोबर मार्गदर्शक म्हणून डॉ. सुषमा तायडे (श्रीरामचंद्र कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग) व प्रा. प्रीती डावरे (सिंहगड अॅकॅडमी आॅफ इंजिनिअरिंग, कोंढवा), व्यवस्थापक म्हणनू कला व वाणिज्य महाविद्यालय दोडी (सिन्नर) यांची नेमणूक झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संघ डिसेंबर महिन्यात होणाºया अखिल भारतीय आंतरविद्यापीठ महिला हॉकी स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.