आठवडाभरात घटनादुरुस्ती करा, सर्वोच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 05:09 AM2017-12-05T05:09:44+5:302017-12-05T05:09:56+5:30
क्रीडा महासंघ या नात्याने २०११ च्या राष्ट्रीय क्रीडा विकास संहितेनुसार आठवडाभरात घटनादुरुस्ती करा आणि पुढील चार आठवड्यात त्यानुसार निवडणूक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने तिरंदाजी महासंघाला दिले आहेत.
नवी दिल्ली : क्रीडा महासंघ या नात्याने २०११ च्या राष्ट्रीय क्रीडा विकास संहितेनुसार आठवडाभरात घटनादुरुस्ती करा आणि पुढील चार आठवड्यात त्यानुसार निवडणूक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने तिरंदाजी महासंघाला दिले आहेत.
दिल्ली उच्च न्यायालयाने प्रशासक नेमलेले माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांच्या देखरेखीत घटनादुरुस्ती केल्यानंतर निवडणूक घ्यावी, असे आदेशात म्हटले आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा आणि न्या. ए.एम. खानविलकर तसेच डी. वाय. चंद्रचूड यांच्या पीठाने कुरेशी यांना घटनादुरुस्तीनंतर तिरंदाजी महासंघाची निवडणूक पार पाडण्यास सांगितले आहे. १० आॅगस्ट रोजी उच्च न्यायालयाने तिरंदाजी महासंघाच्या विरोधात निकाल दिल्यानंतर महासंघाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर निकाल देताना सरन्यायाधीशांनी २०१२ मध्ये सरकारने चार महिन्यांसाठी तिरंदाजी महासंघाची मान्यता काढून घेतली होती. त्याचवेळी घटनादुरुस्ती का केली नाही, अशी विचारणा करीत कुरेशी यांच्या मार्गदर्शनात महासंघाचे काम सुरळीत करण्याचे निर्देश दिले. तिरंदाजी महासंघाची घटना राष्टÑीय क्रीडा संहितेला अनुसरून नाही. अनेक त्रुटी आहेत, असे अतिरिक्त महाधिवक्ता पी. एस. नरसिंहा यांनी निदर्शनास आणून दिले. (वृत्तसंस्था)