सिलंबम खेळाडूंना शिष्यवृत्ती

By admin | Published: May 8, 2017 03:55 AM2017-05-08T03:55:00+5:302017-05-08T03:55:00+5:30

सिलंबम खेळामध्ये महाराष्ट्र संघाला नेहमी अग्रेसर ठेवणाऱ्या खेळाडूंना नुकताच शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले. सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक

Scholarship for the Cilibm players | सिलंबम खेळाडूंना शिष्यवृत्ती

सिलंबम खेळाडूंना शिष्यवृत्ती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सिलंबम खेळामध्ये महाराष्ट्र संघाला नेहमी अग्रेसर ठेवणाऱ्या खेळाडूंना नुकताच शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात आले. सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक अशा तीन गटांमध्ये एकूण ३० खेळाडूंचा यावेळी गौरव करण्यात आल. तसेच, राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केलेल्या खेळाडूंनाही यावेळी विशेष शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
आॅल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी किशोर येवले यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमात नवी मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त किरण पाटील यांच्या हस्ते ६१व्या राष्ट्रीय स्पर्धेत चमक दाखवलेल्या खेळाडूंना गौरविण्यात आले. शिवकालीन युध्दकलेवर आधारीत असलेल्या सिलंबममध्ये नेहमीच महाराष्ट्राने एकहाती वर्चस्व राखले असून, राष्ट्रीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये सिलंबम संघाने महाराष्ट्राला आतापर्यंत सर्वाधिक पदके मिळवून दिली आहे.

सुवर्ण पदक विजेते :
प्रेरणा मोरे, अंशुल कांबळे, अंकिता धोंडे, आसावरी चव्हाण, सुरज खळदकर, शिवम शेलार, मुस्कान मुलानी, रामचंद्र बदक, कनिका बोराडे, अनिकेत डोंगरदिवे, पवन पाल आणि मानसी कुंभार.
रौप्य पदक विजेते :
रिया चव्हाण, शिवम गायकवाड, ऋषिल कोंडे, नेहल तांडेल, वैभव काळे, प्रतिक्षा भेंडकर, वंशिका चिकणे, क्षितीज शिंदे आणि हस्ती भानुशाली.

शिष्यवृत्तीप्राप्त खेळाडू :-

कांस्य पदक विजेते :
ओमकार अभंग, राजश्री जानकर, राहुल पाटील, सचिन गर्जे, वैभव यादव आणि वैष्णव खोत.

सहभागी खेळाडू :
विश्रृती वाघमारे, निरज रावत आणि प्राजक्ता जाधव.

Web Title: Scholarship for the Cilibm players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.