सीमा पुनियाची ‘सुवर्ण’ फेक
By admin | Published: May 30, 2016 02:54 AM2016-05-30T02:54:32+5:302016-05-30T02:54:32+5:30
सीमा पुनियाने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करताना यंग थ्रोअर्स क्लासिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आगामी रिओ आॅलिम्पिकसाठी आपली जागा निश्चित केली.
कॅलिफोर्निया : आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पटकावणाऱ्या भारताच्या सीमा पुनियाने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करताना यंग थ्रोअर्स क्लासिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून आगामी रिओ आॅलिम्पिकसाठी आपली जागा निश्चित केली.
रविवारी अमेरिकेत झालेल्या या स्पर्धेत हरियाणाच्या पुनियाने दबदबा राखून आॅलिम्पिक तिकीट मिळवले. या स्पर्धेत आॅलिम्पिक प्रवेश निश्चित करण्यासाठी ६१ मीटरची थाळी फेक करणे आवश्यक होते. पुनियाने या वेळी शानदार कामगिरी करताना ६२.६२ मीटरची ‘सुवर्ण’ फेक करून आॅलिम्पिक प्रवेश निश्चित केला.
याआधी २००४ आणि २०१२ साली झालेल्या आॅलिम्पिक स्पर्धेत पुनियाने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. त्याव्यतिरिक्त २००६ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत पुनियाने रौप्यपदकही पटकावले होते. त्याचप्रमाणे २०१४ सालच्या आशियाई स्पर्धेत पुनियाने सुवर्ण पटकावून भारतासाठी अभिमानास्पद कामगिरी केली होती. आता, रिओ आॅलिम्पिकच्या तयारीसाठी क्रीडा मंत्रालयाच्या टार्गेट आॅलिम्पिक पोडियम (टॉप) योजना अंतर्गत पुनिया अमेरिकेत प्रशिक्षणासाठी जाईल. (वृत्तसंस्था)