सेहवाग व गंभीर यांनी केली जेटलीची पाठराखण
By Admin | Published: December 21, 2015 12:02 AM2015-12-21T00:02:06+5:302015-12-21T00:02:06+5:30
भ्रष्टाचाराच्या आरोपाला सामोरे जात असलेले डीडीसीएचे माजी अध्यक्ष अरुण जेटली यांना राज्यातील दोन स्टार क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर यांचे समर्थन मिळाले आहे.
नवी दिल्ली : भ्रष्टाचाराच्या आरोपाला सामोरे जात असलेले डीडीसीएचे माजी अध्यक्ष अरुण जेटली यांना राज्यातील दोन स्टार क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर यांचे समर्थन मिळाले आहे. २०१३ पर्यंत १३ वर्षे डीडीसीएचे अध्यक्षपद भूषवणारे केंद्रीय मंत्री जेटली यांच्या दिल्ली सरकारने भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. स्वतंत्र व निष्पक्ष चौकशीसाठी जेटली यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळातून वगळण्यात यावे, अशी दिल्ली सरकारने मागणी केली आहे. गंभीर व सेहवाग यांनी मात्र जेटली यांची पाठराखण केली आहे.
गंभीरने टिष्ट्वट केले की,‘डीडीसीएतील भ्रष्टाचारासाठी अरुण जेटली यांना दोषी ठरवणे चुकीचे आहे. कराचा पैसा न वापरता दिल्लीसाठी उपयुक्त स्टेडियम निर्माण करणे केवळ जेटलीमुळे शक्य झाले. डीडीसीएमध्ये जे काही चुकीचे घडत आहे त्यासाठी माजी खेळाडू अरुण जेटली यांनी जबाबदार ठरवत असल्याचे बघून वाईट वाटते. आरोप करणाऱ्या माजी खेळाडूंना केवळ जेटली यांच्यामुळेत त्यांना डीडीसीएमध्ये मोठे पद भूषविता आले आहे. ’
यंदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणाऱ्या सेहवागने राजकीय वक्तव्य करण्याचे टाळले, पण त्याने टिष्ट्वट करताना खेळाडूंच्या मदतीसाठी जेटली यांच्या भूमिकेची प्रशंसा केली. यंदाच्या रणजी मोसमात दिल्लीऐवजी हरियाणाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सेहवागने टिष्ट्वट केले की,‘डीडीसीएसोबत जुळलेला असताना जर मला एखाद्या खेळाडूच्या आश्चर्यजनक निवडीबाबत माहिती मिळाली, तर मला केवळ जेटली यांना सूचना करावी लागत होती. ते लगेच त्याची दखल घेत होते.’
गंभीरने पत्रकार परिषदेत जेटली यांची पाठराखण केली. गंभीर म्हणाला, ‘जेटली यांच्या कार्यकाळात दिल्ली क्रिकेटसाठी चांगले कार्य झाले, पण त्यांनी पद सोडल्यानंतर गेल्या दोन वर्षांत येथील परिस्थिती बिघडली. जेटली यांच्या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय स्टेडियम बांधल्या गेले. सुरुवातील कोटला कसे स्टेडियम होते, याची तुम्हाला चांगली कल्पना आहे. आता कोटला कसे स्टेडियम आहे, हे दिसतेच आहे. हे सर्व जेटली यांच्या अध्यक्षपदाखाली शक्य
झाले. आज जेटलीवर टीका करीत असलेले लोक क्रिके ट सुधार समितीचे सदस्य होते.
गंभीर पुढे म्हणाला,‘भ्रष्टाचार झाला किंवा नाही, याची मला माहिती नाही, पण माझ्या मते सध्या जे पदाधिकारी आहेत ते डीडीसीएमध्ये असायला नको. त्यांनी कधीच क्रिकेटच्या हिताचा विचार केलेला नाही. यापूर्वीची परिस्थिती चांगली होती. ’ गंभीर, वीरेंद्र सेहवाग
आणि अन्य काही सीनिअर खेळाडूंना दिल्ली अॅण्ड जिल्हा क्रिकेट संघटनेच्या समितीवर नाराजी व्यक्त करताना २००९ मध्ये विरोध दर्शवला होता. (वृत्तसंस्था)
योग्य खेळाडूला न्याय मिळाला पाहिजे, यासाठी जेटली झटत होते. डीडीसीएतील काही अन्य पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणे वाईट स्वप्नाप्रमाणे होते, पण अरुण जेटली अडचणीच्या वेळी नेहमी खेळाडूंसाठी उपलब्ध असायचे.
- वीरेंद्र सेहवाग
आमचा विरोध जेटली यांना नव्हता तर डीसीसीएतील अन्य पदाधिकाऱ्यांना होता. आम्ही कधीच त्यांच्या नावाचा उल्लेख केला नाही. आम्हाला अडचण भासली, तर आम्ही जेटली यांच्याकडे धाव घेत होतो आणि ते तोडगा काढत होते. माझे व सेहवागचे जेटली यांच्यासोबत नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत.
- गौतम गंभीर