सेहवागने संघात शांतचित्त, दडपणमुक्त वृत्तीचा संचार केला

By admin | Published: April 12, 2017 03:33 AM2017-04-12T03:33:38+5:302017-04-12T03:33:38+5:30

आयपीएलच्या आणखी एका पर्वाला शानदार सुरुवात झाली. हैदराबादचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम सलामी लढतीदरम्यान खच्चून भरले होते. हे चित्र स्पर्धेच्या

Sehwag managed to maintain calm, depressed attitude in the team | सेहवागने संघात शांतचित्त, दडपणमुक्त वृत्तीचा संचार केला

सेहवागने संघात शांतचित्त, दडपणमुक्त वृत्तीचा संचार केला

Next

- सौरव गांगुली लिहितो...

आयपीएलच्या आणखी एका पर्वाला शानदार सुरुवात झाली. हैदराबादचे राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियम सलामी लढतीदरम्यान खच्चून भरले होते. हे चित्र स्पर्धेच्या लौकिकात भर पाडणारे आहे. २००९च्या जेतेपदाचा अपवाद वगळता त्यावेळच्या डेक्कन चार्जर्सने फारसे यश मिळविले नसल्याने चाहत्यांची संख्या रोडावली होती. पण डेव्हिड वॉर्नर, युवराजसिंग, मोझेस हेन्रिक्स आणि राशीद खान यांंच्या अफलातून कामगिरीमुळे चाहत्यांची संख्या पुन्हा वाढली आहे.
खेळाडूंच्या जखमांमुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाची सुरुवातच पराभवाने झाली. अन्य संघांनी मात्र थाटात सुरुवात केली आहे. एबी डिव्हिलियर्सने सोमवारी बहारदार खेळी केली. पण, कोहलीच्या आक्रमक नेतृत्वाला हा संघ मुकल्यामुळे दुसरा पराभव पदरी पडला. सनरायजर्स हैदराबाद, किंग्स इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाईट रायडर्सने मात्र विजयी सुरुवात केली आहे. मुस्तफिजूर रहमानच्या समावेशामुळे हैदराबाद संघ तुल्यबळ जाणवतो आहे. हा संघ आणखी भक्कम होईल.
केकेआरदेखील बलाढ्य संघ आहे, पण ख्रिस लीनची दुखापत त्यांच्यासाठी महागडी ठरू शकते. त्यावर व्यवस्थापन तोडगा काढेल, अशी आशा आहे.
पंजाब संघाच्या कामगिरीत नेहमी चढ-उतार जाणवायचा. गेल्या मोसमात हा संघ पात्रता फेरीही गाठू शकला नव्हता. यंदा त्यांची विजयी घोडदौड सुरू झाली. त्यांचा कर्णधार ग्लेन मॅक्सवेल जबर फॉर्ममध्ये आहे. तो आघाडीवर असेल तर काहीही शक्य आहे. कुणावरही विजय कठीण नसेल. वीरेंद्र सेहवागसारख्या मेंटरमुळे या संघात मोठा फरक जाणवत आहे. सेहवागने संघात शांतचित्त आणि दडपणमुक्त वृत्ती या दोन्ही बाबींचा संचार केला. सेहवाग खेळायचा तेव्हा या दोन्ही गोष्टी त्याच्या खेळात सतत जाणवत असायच्या. टी-२० सारख्या प्रकारात खेळताना या दोन्ही गोष्टींना फार महत्त्व असते. (गेमप्लान)

Web Title: Sehwag managed to maintain calm, depressed attitude in the team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.