राष्ट्रीय पुरस्कार निवड समितीत सेहवाग,सरदारसिंग यांचा समावेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2020 05:18 AM2020-08-01T05:18:39+5:302020-08-01T05:19:04+5:30
र्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. मुकुंदम शर्मा हे समितीचे अध्यक्ष असतील,असे मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले.
नवी दिल्ली : क्रीडा मंत्रालयाने राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०२० साठी शुक्रवारी निवड समिती जाहीर केली. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि माजी हॉकी कर्णधार सरदारसिंंग यांचा समितीत समावेश करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्या. मुकुंदम शर्मा हे समितीचे अध्यक्ष असतील,असे मंत्रालयाच्यावतीने सांगण्यात आले.
समिती सदस्यांमध्ये सेहवाग (क्रिकेट), सरदारसिंग (हॉकी), मोनालिसा बरुआ मेहता(टेटे),दीपा मलिक (पॅरा अॅथ्लेटिक्स),आणि व्यंकटेशन देवराजन (बॉक्सिंग) यांच्यासह प्रसिद्ध समालोचक मनीष बटाविया, क्रीडा पत्रकार आलोक सिन्हा आणि नीरू भाटिया आदींचा समावेश आहे. क्रीडा मंत्रालयाच्यावतीने साईचे महासंचालक संदीप प्रधान, क्रीडा विभागाचे संयुक्त सचिव एल. एस. सिंग आणि टार्गेट आॅलिम्पिक पोडियम (टॉप्स) योजनेचे प्रमुख राजेश राजागोपालन हेही समितीत राहतील. द्रोणाचार्य पुरस्कारासाठी ज्यांना आधी हा पुरस्कार मिळाला आहे अशा दोन सदस्यांची समितीत निवड करण्याचा अधिकार अध्यक्षांना असेल. ही समिती राजीव गांधी खेलरत्न, द्रोणाचार्य, अर्जुन, ध्यानचंद, राष्टÑीय क्रीडा प्रोत्साहन तसेच मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफीसाठी विजेत्यांची निवड करणार आहे. (वृत्तसंस्था)