स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बोरीवलीत, ३०० खेळाडूंचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2018 07:46 PM2018-04-10T19:46:17+5:302018-04-10T19:46:17+5:30

मुंबई उपनगरात प्रथमच चौथी स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा (पुरुष व महिला) चे आयोजन बोरीवली मध्ये करण्यात आले आहे.

Self Khashaba Jadhav Trophy State Wrestling Competition in Borivali, comprising 300 players | स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बोरीवलीत, ३०० खेळाडूंचा समावेश

स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा बोरीवलीत, ३०० खेळाडूंचा समावेश

Next

मुंबई :  राज्य सरकारच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य कुस्तीगार परिषद तसेच मुंबई उपनगर जिल्हा पूर्व व पश्चिम तालीम संघ आणि विभागीय क्रीडा संकुल कार्यकारी समिती यांच्यावतीने मुंबई उपनगरात प्रथमच चौथी स्व. खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा (पुरुष व महिला) चे आयोजन बोरीवली मध्ये करण्यात आले आहे. या स्पर्धेचा शुभारंभ १३ एप्रिल रोजी होणार असून १५ एप्रिलला कुस्ती स्पर्धेचा समारोप होणार आहे.

राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा (पुरुष महिला) २०१७-१८ च्या स्पर्धांमध्ये फ्री स्टाईल गटात १०० पुरुष खेळाडू, ग्रीको रोमन गटात १०० पुरुष खेळाडू तर फ्री स्टाईल गटात १०० महिला खेळाडू असे एकूण ३०० खेळाडू सहभागी होणार आहेत. २०१७-१८ वर्षाची ही स्पर्धा विभागीय क्रीडा संकुल, शिंपोली, बोरीवली या ठिकाणी १३ ते १५ एप्रिल २०१८ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. फ्री-स्टाईल, ग्रीको रोमन आणि महिला फ्री-स्टाईल गटामध्ये १० वजनगटात स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. तसेच बक्षिसाच्या ग्रीको रोमन व फ्री-स्टाईल गटामध्ये रु. १०,४०,०००/- प्रत्येकी तर महिलांच्या फ्री स्टाईल गटामध्ये रु. १०,४०,०००/- अशी एकुण रु. ३१,२०,०००/- ची बक्षिसे या वर्षीच्या कुस्ती स्पर्धेत देण्यात येणार आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन १३ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता क्रीडामंत्री श्री. विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. याप्रसंगी ऑलिम्पिक विजेते पैलवान नरसिंह यादव उपस्थित राहणार आहेत. स्पर्धेचा समारोप १५ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. भारतासाठी पहिले व कुस्तीतील हे पहिले ऑलिंपिक ब्राँझ पदक विजेते स्व. खाशाबा जाधव यांनी कुस्ती क्षेत्रात केलेल्या कामगिरीचा गौरव म्हणून राज्य स्तरावर त्यांच्या नावाने स्व. खाशाबा जाधव चषक कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. 

महाराष्ट्राच्या क्रीडा संस्कृतीची जोपासना व वाढ होण्यासाठी विविध खेळांच्या माध्यमातून युवा पिढीला खेळाकडे आकृष्ट करणे व त्यांच्या मधील क्रीडा गुणांना वाव देणे आवश्यक आहे. महाराष्ट्रात कुस्ती सारख्या देशी खेळाबाबत ग्रामीण व शहरी भागात विशेष आत्मियता आहे. कुस्ती हा खेळ महाराष्ट्रात सर्वत्र खेळला जातो. देशातील इतर राज्यात व देशाबाहेरही कुस्ती खेळाचा प्रचार व प्रसार करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. राज्याची कुस्ती खेळातील कामगिरी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरही उल्लेखनीय आहे.

Web Title: Self Khashaba Jadhav Trophy State Wrestling Competition in Borivali, comprising 300 players

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Sportsक्रीडा