'शोभा डें'ना उत्तर देण्यासाठी अमिताभ काढणार सिंधूसोबत सेल्फी

By admin | Published: August 19, 2016 11:59 AM2016-08-19T11:59:46+5:302016-08-19T12:13:44+5:30

'तुम्ही मोकळ्या हाती नाही, पदक घेऊन परत येत आहात...आणि आम्हाला तुमच्यासोबत 'सेल्फी' काढायची इच्छा आहे', असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे

Selfie with Amitabh for Sindh to answer 'Shobha Danne' | 'शोभा डें'ना उत्तर देण्यासाठी अमिताभ काढणार सिंधूसोबत सेल्फी

'शोभा डें'ना उत्तर देण्यासाठी अमिताभ काढणार सिंधूसोबत सेल्फी

Next
- ऑनलाइन लोकमत 
मुंबई, दि. 19 - रिओ ऑलिम्पिकमध्ये जपानच्या ओकुहारा नोझोमीवर पराभव करत सिंधूने भारतासाठी पदक निश्चित केले आहे. अंतिम सामन्यासाठी तिला देशभरातून शुभेच्छा मिळत आहेत, सोबतच कौतुकाचादेखील वर्षाव होत आहे. यावेळी खेळाडूंवर टीका करणा-या शोभा डे यांच्यावर सोशल मीडियावरुन टीकेचा सूर उमटला आहे. बॉलिवूड शेहनशहा अमिताभ बच्चनदेखील यामध्ये मागे नाहीत. त्यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून पी व्ही सिंधूचं कौतूक करत शोभा डे यांना चांगलाच टोमणा मारला आहे. 
 
'तुम्ही मोकळ्या हाती नाही, पदक घेऊन परत येत आहात...आणि आम्हाला तुमच्यासोबत 'सेल्फी' काढायची इच्छा आहे', असं ट्विट अमिताभ बच्चन यांनी केलं आहे. अमिताभ यांनी शोभा डेंना उद्धेशून सेल्फीचा उल्लेख केला आहे हे स्पष्ट आहे. कारण काही दिवसांपुर्वी शोभा डे यांनी  'भारतीय संघाचं केवळ एकच लक्ष्य आहे. रिओला जा, सेल्फी काढा आणि खाली हात परत या. हा संधी आणि पैशांचा अपव्यय आहे', असं ट्विट केलं होतं. 
 
फक्त अमिताभ बच्चनच नाही तर भारतीय संघाचा एकेकाळचा तडाखेबाज फलंदात विरेंद्र सेहवागने तर सिक्सरच मारला आहे. 'साक्षी मलिक के गले में मेडल कितना 'शोभा दे' रहा है ना",  असं टि्वट करून वीरेंद्र सेहवागनं धुमाकूळ उडवून दिला. ट्विटरवर वीरेंद्र सेहवागचा मोठा फॅन क्लब असल्यामुळे त्याच्या त्या ट्विटवर अक्षरशः फॅन तुटून पडले होते. सेहवागच्या या ट्विटला अमिताभ बच्चन यांनीदेखील लाईक करत विशेष 'वीरूजी आपका सेन्स ऑफ ह्युमर ने एक और सिक्सर मार दिया स्टेडिअम के बाहर' म्हणत दिलखुलास दाद दिली होती. 
 

Web Title: Selfie with Amitabh for Sindh to answer 'Shobha Danne'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.