चंडीगड, पतियाळा उपांत्य फेरीत

By admin | Published: April 14, 2015 02:01 AM2015-04-14T02:01:47+5:302015-04-14T02:01:47+5:30

राष्ट्रीय वरिष्ठ गट हॉकी चषक स्पर्धेत चंडीगड, पतियाळा व नामधारी इलेव्हन संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत उपांत्य फेरीत धडक मारली.

In the semi-finals of Chandigarh, Patiala | चंडीगड, पतियाळा उपांत्य फेरीत

चंडीगड, पतियाळा उपांत्य फेरीत

Next

पुणे : राष्ट्रीय वरिष्ठ गट हॉकी चषक स्पर्धेत चंडीगड, पतियाळा व नामधारी इलेव्हन संघाने प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत उपांत्य फेरीत धडक मारली. उत्कंठावर्धक लढतीत हिमाचलने मणिपूरचा सडनडेथमध्ये पराभव करीत उपांत्य फेरीतील आपली जागा निश्चित केली.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे उपांत्यपूर्व फेरीचे सामने झाले. चंडीगड संघाने दिल्लीचा ७-० असा धुव्वा उडवित दिमाखात उपांत्य फेरी गाठली. चंडीगड संघाकडून गगनदीप सिंग (१८, ३८ मि़), हरवंत सिंग (१९ मि़), बलविंदर सिंग (२८, ४१ मि़), गुरजिंदर सिंग (४६ मि़), नवदीपसिंग (५३ मि़) यांच्या उत्कृष्ट खेळी करीत दिल्लीच्या बचाव फळीला भगदाड पाडले.
पतियाळाने विदर्भाला ४-२ असे नमवून आगेकूच केली. विदर्भाच्या तौसिफ बेग याने सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटात गोल करीत संघाला आघाडी मिळवून दिली. तर पतियाळाच्या अजय कुमार याने दहाव्या मिनिटास गोल करीत संघाला १-१ बरोबरी साधून दिली. उत्तरार्धात सामन्यावर पकड मिळवित पतियाळाने आघाडी ४ पर्यंत वाढविली. तरणजितसिंग (४८ मि़), अर्जुन सिंग (५९ मि़) यांनी गोल करीत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. तत्पूर्वी अकबर खान (४४ मि़) याने उत्तरार्धात गोल करीत आघाडी २-४ अशी कमी केली.
नामधारी इलेव्हन संघाने सीआयएसएफ संघाचा टायब्रेकमध्ये २-१ असा पराभव करीत पुढील फेरी गाठली. निर्धारित वेळेत नामधारी कडून अवतार सिंग (१२ मि़) व सायरील एक्का (६० मि़) यांनी गोल केला. टायब्रेकमध्ये विजयी संघाकडून कुलदीप सिंग व बिशन सिंग गोल करीत संघाला निर्णायक आघाडी मिळवून दिली. पराभूत संघाकडून एक्का गोल करण्यात यशस्वी ठरला. (क्रीडा प्रतिनिधी)

अन्य निकाल
च्हिमाचलने मणिपूरचा सडनडेथमध्ये १-० असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. निर्धारित वेळेत सामना ३-३ असा बरोबरीत सुटला.
च्मणिपूरच्या प्रेमचंद (१० मि़), बंटी सिंग (१७ मि़) यांनी संघाला २-१ अशी आघाडी मिळवून दिली.
च्त्यानंतर हिमाचलच्या विनोद दुर्गा (१८ मि़), नौरवी (४७ मि़) व अजय सिंग (५०) यांनी पिछाडीवरून संघाला आघाडी मिळवून दिली
च्त्याआधी बंटी सिंगाने ५७व्या मिनिटाला गोल करीत मणिपूरलाला ३-३ बरोबरी साधून दिलेली.

Web Title: In the semi-finals of Chandigarh, Patiala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.