राष्ट्रकुल क्रीडा ग्राममध्ये सिरिंंज मिळाल्याने खळबळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 03:07 AM2018-04-01T03:07:27+5:302018-04-01T03:07:27+5:30
राष्ट्रकुल क्रीडा ग्राममध्ये भारतीय पथकाची निवास व्यवस्था असलेल्या परिसरात सिरिंंज मिळाल्यानंतर चौकशी सुरू झाली आहे, पण भारतीय अधिकाऱ्याने मात्र कुठले चुकीचे काम झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
गोल्डकोस्ट : राष्ट्रकुल क्रीडा ग्राममध्ये भारतीय पथकाची निवास व्यवस्था असलेल्या परिसरात सिरिंंज मिळाल्यानंतर चौकशी सुरू झाली आहे, पण भारतीय अधिकाऱ्याने मात्र कुठले चुकीचे काम झाले नसल्याचे स्पष्ट केले आहे.
येथे आलेल्या वृत्तनुसार ही सिरिंज भारतीय खेळाडूंची निवास व्यवस्था असलेल्या परिसरापासून काही अंतरावर मिळाली आहे. सिरिंंज कुठून आली, याचा मात्र अद्याप उलगडा झालेला नाही.
राष्ट्रकुल क्रीडा महासंघाचे मुख्य कार्यकारी डेव्हिड ग्रेवेमबर्ग म्हणाले की, क्रीडाग्राममध्ये कार्यरत असलेल्या स्टाफमधील एका कर्मचाºयाने त्यांना सिरिंंजबाबत सांगितले आणि आता त्याबाबत चौकशी सुरू आहे.’
भारतीय पथकासोबत येथे आलेल्या भारतीय अधिकाºयाने सांगितले की,‘सिरिंंज भारतीय खेळाडूंच्या खोलीमधून मिळालेली नाही. या परिसरात अनेक देशांचे खेळाडू राहात आहेत. या प्रकरणात अधिक फॉलोअपची गरज असेल तर सीजीएफ वैद्यकीय आयोग प्रक्रियाचे पालन करेल.’ (वृत्तसंस्था)