कोल्हापूरच्या प्रेरणाचा सनसनाटी विजय
By Admin | Published: July 12, 2016 09:44 PM2016-07-12T21:44:56+5:302016-07-12T21:44:56+5:30
कोल्हापूरच्या प्रेरणा अल्वेकातने धडाकेबाज खेळ करताना नागपूरच्या अव्वल मानांकीत सई नंदुरकरला सरळ दोन गेममध्ये पराभूत करत दुसऱ्या महाराष्ट्र राज्य डॉ. विजय पाटील सब
राज्य बॅडमिंटन : अव्वलमानांकीत सईला नमवून उपांत्यपुर्व फेरीत धडक
मुंबई : कोल्हापूरच्या प्रेरणा अल्वेकातने धडाकेबाज खेळ करताना नागपूरच्या अव्वल मानांकीत सई नंदुरकरला सरळ दोन गेममध्ये पराभूत करत दुसऱ्या महाराष्ट्र राज्य डॉ. विजय पाटील सब - ज्युनिअर बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेत मुलींच्या १५ वर्षांखालील गटाची उपांत्यपुर्व फेरी गाठली. दुसरीकडे मुलांमधून नागपूरच्या अग्रमानांकीत रोहान गुरबानी याने विजयी कूच केली.
रायगड बॅडमिंटन संघटनेच्या वतीने नेरुळ येथील डॉ. डीवाय स्पोटर््स अॅकेडमीमध्ये सुरु असलेल्या या स्पर्धेत प्रेरणाने खळबळजनक निकाल लावताना विजेतेपदाची प्रबळ दावेदार असलेल्या सईला २१-१८, २१-५ असे नमवले. पुण्याच्या जान्हवी कानिटकरने देखील विजयी आगेकूच करताना ॠषा दुबेला २१-१२, २१-१५ असे पराभूत केले. अन्य पुणेकर रुचा सावंतने विजयी घोडदौड कायम ठेवताना ठाण्याच्या उर्वी ठाकूरदेसाईला २१-१८, २३-२१ असा धक्का दिला. तर तनिष्का देशापांडे आणि अनन्या फडके या अन्य पुणेकरांनीही आपआपल्या सामन्यात बाजी मारत उपांत्यपुर्व फेरी गाठली.
मुलांमध्ये नागपूरच्या रोहनने अपेक्षित कामगिरी करताना पुण्याच्या सस्मित पाटीलला २१-६, २१-१४ असे लोळवले. तर मुंबई उपनगरच्या सुशांत रव्वाला नागपूरच्या सिफत अरोराविरुद्ध २१-१६, १२-२१, २१-२३ अशी हार पत्करावी लागली. मुंबई उपनगरच्या चौथ्या मानांकीत तनिष्क सक्सेनाने आपल्या लौकिकानुसार विजय मिळवताना नाशिकच्या अदीप गुप्ताला २१-१४, २१-७ असे पराभूत केले. तर पुण्याच्या पार्थ घुबे याने आक्रमक खेळाच्या जोरावर रायगडच्या विश्वम पारिखचे आव्हान २१-११, २१-१३ असे संपुष्टात आणले. (क्रीडा प्रतिनिधी)
............................................
इतर निकाल :
१५ वर्षांखालील :
(मुली) : तनिष्का देशापांडे (पुणे) वि.वि. खुशी कुमारी २१-५, २१-११; रुद्रा राणे वि.वि. आदिती सधणकर २१-१०, २१-१२; सिध्दी जाधव (सातारा) वि.वि. साहन्या कुलकर्णी (पुणे) २१-७, २१-९; अनन्या फडके (पुणे) वि.वि. पूजा कचरे २१-१६, २२-२०; आर्या देशपांडे (सातारा) वि.वि. इरा उंबरजे (पुणे) २१-१४, २१-१७.
(मुले) : अमेय खोंड (नाशिक) वि.वि. आयुष खांडेकर (पुणे) २१-१९, १०-२१, २१-१९; सुधांशू भुरे (नागपूर) वि.वि. वेदांत गोखले (पुणे) २१-१२, २१-११.
१३ वर्षांखालील (मुले) :
दर्शन पुजारी (पुणे) वि.वि. यश पवार (ठाणे) २१-६, २१-१३; स्कंद शानबाघ (नाशिक) वि.वि. आर्या ठाकोरे (पुणे) २१-१२, २१-१५; अथर्व जोशी (मुंबई उपनगर) वि.वि. सार्थक पाखमोडे (नागपूर) २१-७, २१-१४; आर्यन घोष (मु. उपनगर) वि.वि. सिध्दार्थ बावनकर (नागपूर) १५-२१, २१-१८, २४-२२; प्रथम वाणी (पुणे) वि.वि. आरव फर्नांडिस (नागपूर) २२-२०, २१-१७; प्रज्ज्वल सोनावणे (नाशिक) वि.वि. शुभक अहिरे (नाशिक) २१-१७, २१-१८; वर्धान ढोंंग्रे (पुणे) वि.वि. अरविंद्र राव (पुणे) १८-२१, २१-१७, २१-१९; तेजस शिंदे (सांगली) वि.वि. अदित एम. (ठाणे) २१-१३, २१-१२.