सेरेना, जोकोविच यांना अव्वल मानांकन

By Admin | Published: August 27, 2015 03:35 AM2015-08-27T03:35:59+5:302015-08-27T03:35:59+5:30

जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सेरेना विल्यम्स आणि पुरुषांत सर्बियाचा नोव्हाक जोकोविच हे ३१ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या ग्रँडस्लॅम

Serena, Djokovic top rankings | सेरेना, जोकोविच यांना अव्वल मानांकन

सेरेना, जोकोविच यांना अव्वल मानांकन

googlenewsNext

न्यूयॉर्क : जागतिक क्रमवारीतील नंबर वन खेळाडू सेरेना विल्यम्स आणि पुरुषांत सर्बियाचा नोव्हाक जोकोविच हे ३१ आॅगस्टपासून सुरू होणाऱ्या चौथ्या आणि अखेरच्या ग्रँडस्लॅम अमेरिकन ओपन टेनिस (यूएस) स्पर्धेत अव्वल मानांकित खेळाडू असतील.
सेरेना आपल्या घरच्या मैदानावर सोमवारपासून सुरू होणाऱ्या यूएस ओपनमध्ये २७ वर्षांनंतर प्रथमच कॅलेंडर ग्रँडस्लॅम पूर्ण करण्याचे लक्ष्य ठेवून खेळेल. महिला एकेरीत सेरेनाने या वर्षीच्या तिन्ही ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत आणि तिला अव्वल मानांकन देण्यात आले आहे. त्याचप्रमाणे २०१४ची फ्रेंच ओपन उपविजेती रुमानियाची सिमोना हालेप द्वितीय मानांकित खेळाडू असेल. ताज्या क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर घसरण झालेली २००६ची यूएस ओपनविजेती रशियाची मारिया शारापोव्हा हिला तृतीय मानांकन देण्यात आले आहे. तसेच, २०१४ची यूएस ओपनउपविजेती डेन्मार्कची कॅरालिन वोझ्नियाकी चौथी मानांकित खेळाडू असेल. पाच वेळांचा
यूएस ओपन चॅम्पियन स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडररला पुरुष एकेरीत
द्वितीय मानांकन देण्यात आले
आहे.
पुरुष गटात या वेळेसचा मुकाबला खूप संघर्षपूर्ण ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. येथे अव्वल १० मानांकित खेळाडूंत ५ यूएस ओपन चॅम्पियन आणि सहा गँ्रडस्लॅम चॅम्पियन खेळणार आहेत. त्यात २०११चा यूएस ओपन चॅम्पियन सर्बियाचा नोव्हाक जोकोविच याला अव्वल मानांकन देण्यात आले. त्याचबरोबर, २००४ आणि २००८चा विजेता फेडरर द्वितीय मानांकित खेळाडू असेल, तसेच २०१२चा विजेता ब्रिटनचा अँडी मरे, २०१० आणि २०१३चा चॅम्पियन स्पेनचा राफेल नदाल आणि गेल्या वर्षीचा चॅम्पियन क्रोएशियाचा मारिन सिलीच यांचा अव्वल १० मानांकित खेळाडूंमध्ये समावेश आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Serena, Djokovic top rankings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.