सेरेना, केर्बर, व्हीनस उपांत्य फेरीत
By admin | Published: July 6, 2016 12:49 AM2016-07-06T00:49:59+5:302016-07-06T00:49:59+5:30
आॅस्ट्रेलियन ओपनविजेती जर्मनीची अॅजेलिक केर्बर हिने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून रुमानियाच्या सिमोना हालेपचा, तर दुसरीकडे अमेरिकेच्या सेरेना व व्हीनस विल्यम्स
लंडन : आॅस्ट्रेलियन ओपनविजेती जर्मनीची अॅजेलिक केर्बर हिने सर्वोत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून रुमानियाच्या सिमोना हालेपचा, तर दुसरीकडे अमेरिकेच्या सेरेना व व्हीनस विल्यम्स भगिनींनी अनुक्रमे रशियाची एनस्तेसिया पावलिचेनकोव्हा व कझाकिस्तानच्या यारोस्लाव्हा श्वेदोव्हा यांचा पराभव करून विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत धडक मारली. दुसरीकडे, पुरुष एकेरीत ब्रिटनच्या अँडी मरेने आॅस्ट्रेलियाच्या निक किर्गियोसला नमवून अंतिम सोळांमधील आपली जागा निश्चित केली. पुरुषांच्या दुसऱ्या लढतीत फ्रान्सच्या लुकास पोईलीने आॅस्ट्रेलियाच्या बर्नाड टॉमिकला पराभवाचा धक्का दिला.
चौथे मानांकन असलेल्या केर्बरने पाचव्या मानांकित हालेपला १ तास ३० मिनिटांत सलग दोन सेटमध्ये ७-५, ७-६ असे पराभूत केले. केर्बरने दुसऱ्यांदा
विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला
आहे. दुसरीकडे, माजी नंबर वन आणि
पाच वेळची विजेती व्हीनसने आठवी मानांकित असलेल्या यारोस्लाव्हाला १ तास ४२ मिनिटे चाललेल्या लढतीत ७-६, ६-२ गुणांनी पराभूत केले. वर्ल्ड नं. १ सेरेना विलियम्सने एनस्तेसियाला सरळ दोन सेटमध्ये ६-४, ६-४ असे पराभूत केले.
जागतिक क्रमवारीत दुसऱ्या असलेल्या मरेने चौथ्या फेरीत १५ वे मानांकन असलेल्या किर्गियोसला सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले. घरच्या मैदानावर खेळत असलेल्या मरेच्या नावाला विजेतेपदाचा दावेदार म्हणून सट्टेबाजांची पसंदी जास्त आहे. जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मरेने आतापर्यंत या स्पर्धेत एकही सेट गमाविला नाही. अंतिम आठमध्ये मरेला १२ वा मानांकीत विलफ्रेड सोंगाचे आव्हान असणार आहे.
दुसरीकडे पुरुष एकेरीत ३२ वा मानांकित फ्रान्सच्या लुकास पोईलीने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून १९ व्या मानांकित बर्नाड टॉमिकला तीन तास चाललेल्या लढतीत पराभूत केले.
२२ वर्षीय पोईलीने या पूर्वी ग्रॅन्डस्लॅम स्पर्धेत कोणत्याही
मानांकित खेळाडूला पराभूत केले नव्हते. टॉमिकला पुढच्या फेरीत वेस्ली किंवा टॉमस बेर्दीचे आव्हान राहणार आहे.
महिलांच्या गटात चौथ्या फेरीत रशियाच्या एलिनान वेस्त्रीने आपल्या देशाच्या एकातेरिना माकारोव्हाला ५-७, ६-१, ९-७ गुणांनी नमविले.
माजी नंबर वन अमेरिकेच्या व्हीनस विलियम्सने १२ व्या मानांकीत स्पेनच्या कार्ला सुआरेज नवारोला ७-६, ६-४ असे पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. (वृत्तसंस्था)
पेस-हिंगीस पुढच्या फेरीत
भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेस आणि स्टार खेळाडू राहन बोपण्णा यांनी आपापल्या जोडीदारांसह प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला. मिश्र दुहेरीत पेस व मार्टिना हिंगीसने १६ वी मानांकित जोडी न्यूझीलंडच्या आर्टम सिताक व जर्मनीची लॉरा सिग्मंड जोडीला ६-४, ६-४ असे पराभूत करून तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.
सानिया-इव्हान, बोपन्ना-एनस्तेसिया मिश्र दुहेरीत पराभूत
भारताची सानिया मिर्झा व क्रोएशियाचा इव्हान डोडिग या अव्वल मानांकित जोडीला विम्बल्डन टेनिस स्पर्धेत मिश्र दुहेरीच्या दुसऱ्या फेरीत मंगळवारी पराभव स्वीकारावा लागला. सानिया-डोडिग या जोडीचा बिगरमानांकित ब्रिटनची जोडी नील स्कुप्स्की व एना स्मिथ यांनी ४-६, ६-३, ७-५ ने पराभव केला. रोहन बोपन्ना व त्याची आॅस्ट्रेलियन जोडीदार एनस्तेसिया रोडियानोव्हा यांना तिसऱ्या फेरीत जुआन सेबेस्टियन काबेल व मारियन डुक मारिन या जोडीने ६-७, ३-६ असे पराभूत केले.