सेरेना विल्‍यम्स बनली विम्‍बल्‍डन क्वीन

By admin | Published: July 11, 2015 08:32 PM2015-07-11T20:32:28+5:302015-07-11T20:48:23+5:30

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने स्पेनच्या गारबीन मुगुरुझाचा पराभव करत विजेतेपद मिळविले.

Serena Williams creates Wimbledon Queen | सेरेना विल्‍यम्स बनली विम्‍बल्‍डन क्वीन

सेरेना विल्‍यम्स बनली विम्‍बल्‍डन क्वीन

Next
>ऑनलाइन लोकमत
लंडन, दि. ११ - विम्बल्डन टेनिस स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत अमेरिकेच्या सेरेना विल्यम्सने स्पेनच्या गारबीन मुगुरुझाचा पराभव करत विजेतेपद मिळविले. विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील सहावं आणि एकूण २१वं ग्रॅंड स्लॅम विजेतेपद सेरेना विल्यम्सच्या नावावर झाले आहे. विम्बल्डच्या अंतिम सामन्यात सेरेनाने गारबीनचा ६-४, ६-४ असा पराभव केला. 
उपांत्य फेरीत सेरेनाने रशियाच्या मारिया शारापोव्हा हिचा पराभव करत विम्बल्डनच्या महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, तर स्पेनच्या गारबीन मुगुरुझाने पोलंडच्या अग्निरजस्का रादवांस्काला पराभूत करत अंतिम फेरित प्रवेश केला होता. 
१९ वर्षात प्रथमच स्पेनच्या महिला खेळाडू गारबीन मुगुरुझाने विम्बल्डनची अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मुगुरुझाच्या अगोदर अरांता सांचेझने १९९६मध्ये अंतिम फेरीत प्रवेश केला होता. स्पेनच्या कोंचिता मार्टिनेझ हीने १९९४ मध्ये विम्बल्डन जिंकले होते.
 

Web Title: Serena Williams creates Wimbledon Queen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.