गंभीर ह्युजची मृत्यूशी झुंज

By Admin | Published: November 27, 2014 12:43 AM2014-11-27T00:43:26+5:302014-11-27T00:43:26+5:30

शेफिल्ड शील्ड सामन्यादरम्यान बाऊन्सर डोक्यावर आदळून कोमात गेलेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्युज याची प्रकृती नाजूक असून, तो अक्षरश: मृत्यूशी झुंज देत आहे.

Serious Hughes Contend with Death | गंभीर ह्युजची मृत्यूशी झुंज

गंभीर ह्युजची मृत्यूशी झुंज

googlenewsNext
सिडनी : शेफिल्ड शील्ड सामन्यादरम्यान बाऊन्सर डोक्यावर आदळून कोमात गेलेला ऑस्ट्रेलियाचा फलंदाज फिल ह्युज याची प्रकृती नाजूक असून, तो अक्षरश: मृत्यूशी झुंज देत आहे. कसोटी संघात पुनरागमन करण्यासाठी धडपडणा:या ह्युजला सून एबट याचा बाऊन्सर लागला होता. त्याच्यावर सेंट व्हिन्सेंट इस्पितळात तातडीची शस्त्रक्रिया करण्यात आली.
ह्युजच्या प्रकृतीची माहिती देताना ऑस्ट्रेलियाच्या पथकातील डॉक्टर पीटर ब्रूकनर म्हणाले, ‘फिलिपच्या प्रकृतीत कुठलीही सुधारणा झालेली नाही. त्याची स्थिती नाजूक आहे. काही सुधारणा झाल्यास आपल्याला कळविण्यात येईल.’
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने देखील ह्युजच्या स्थितीबाबत वक्तव्य प्रसिद्ध केले. त्यात फिलिपची स्थिती नाजूक असून, शस्त्रक्रिया झाली आहे. जखमेचे स्कॅन करण्यात आले. निष्कर्ष येताच माहिती दिली जाईल, असे म्हटले आहे. दरम्यान, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ह्युजच्या सन्मानार्थ शेफिल्ड शील्डमधील सर्व सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला.(वृत्तसंस्था) 
 
ह्युजने जुने आणि हलक्या दर्जाचे हेल्मेट घातले होते
फिल ह्युजच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंतर क्रिकेटमध्ये सुरक्षेच्या उपायासाठी वापरण्यात येणा:या वस्तूंच्या दर्जाबाबत चर्चा सुरू झाली आहे. ह्युजने दुर्घटनेच्या वेळी घातलेले हेल्मेट जुने तसेच हलक्या दर्जाचे होते, असे हेल्मेट बनविणारी कंपनी ‘मासुरी’ने स्पष्ट केले. 
 
क्रिकेट धोकादायक 
खेळ : लारा
सिडनी : फिल ह्युजला झालेल्या जीवघेण्या दुखापतीच्या पाश्र्वभूमीवर विंडीजचा महान फलंदाज ब्रायन लारा याने क्रिकेट हा धोकादायक खेळ असून, या खेळात नेहमी ‘जोखीम कायम’ असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.  लारा पुढे म्हणाला, ‘क्रिकेटमध्ये फलंदाजांवर धोक्याची टांगती तलवार असते. जे घडले ते दु:खद होते.

 

Web Title: Serious Hughes Contend with Death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.