विस्कटलेली घडी बसविण्यासाठी मांडवली

By admin | Published: December 20, 2014 10:34 PM2014-12-20T22:34:47+5:302014-12-20T22:34:47+5:30

हेवेदावे आणि पदांच्या लालसेपोटी सुरू झालेल्या वादाने महाराष्ट्र राज्य जलतरण स्पर्धेवर निलंबनाची नामुष्की ओढावली आहे.

Setting up a detonating watch | विस्कटलेली घडी बसविण्यासाठी मांडवली

विस्कटलेली घडी बसविण्यासाठी मांडवली

Next

स्वदेश घाणेकर - मालवण
हेवेदावे आणि पदांच्या लालसेपोटी सुरू झालेल्या वादाने महाराष्ट्र राज्य जलतरण स्पर्धेवर निलंबनाची नामुष्की ओढावली आहे. भारतीय जलतरण संघटनेच्या (एसएफआय) पदाधिकाऱ्यांना हाताशी धरून काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांनी ही कारवाई करायला लावल्याचे सांगण्यात येते. त्याच पदाधिकाऱ्यांच्या मदतीने राज्य संघटनेची विस्कटलेली घडी बसविण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यासाठी असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना काही महत्त्वाची पदे देऊन ‘मांडवली’ करण्याच्या हालचालींना सुरुवात झाल्याचे सूत्रांकडून कळते.
राज्य संघटनेच्या निलंबनानंतर होत असलेल्या सिंधुदुर्ग सागरी जलतरण शर्यतीत सहभाग घेऊ नका, असा फतवा काढण्यात आला होता. मात्र, स्पर्धेला मिळालेल्या प्रतिसादामुळे हेच फतवा काढणारे हातमिळवणीसाठी पुढे सरसावले असल्याचे समजते आहे. गेली दहा वर्षे राज्य संघटनेने जमाखर्च न दाखविल्याचे कारण पुढे करत एसएफआयने निलंबनाची कारवाई केली आणि पुण्याचे अभय दाढे यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांच्या अस्थायी समितीची नेमणूक केली. या समितीने सिंधुदुर्ग जलतरण शर्यतीत सहभाग न घेण्याचा फतवा इतर जिल्हा संघटनांना दिला आणि तो न ऐकल्यास खेळाडूंवर निलंबनाची कारवाई करण्यात येईल, असे जाहीर केले. तसे पत्रही जिल्हा संघटनांना पाठविल्याचे या समितीमधील सदस्य प्रभाकर घरत यांनी सांगितले. ते म्हणाले, खेळाडूंचे नुकसान होऊ नये हे माझे मत असून तडजोडीसाठी तयारी आहे. मात्र, राज्य संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी आमच्या तडजोडीच्या प्रस्तावाला त्यांनी दाद दिली नाही.
मात्र, सिंधुदुर्गातील या शर्यतीला १८ संलग्न संघटनेच्या खेळाडूंनी सहभाग नोंदवून हा फतवा मान्य नसल्याचे दाखवून दिले.
त्याचमुळे या समितीला आपले अस्तित्व नष्ट होण्याची भीती वाटू लागली आणि त्यांच्याकडून राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चेचे सत्र सुरू झाले. माजी सचिव किशोर वैद्य यांनीही याला दुजोरा दिला असून येत्या दोन-तीन दिवसांत वाद मिटेल, अशी आशा व्यक्त केली आहे. ते म्हणाले, संघटनेवर निलंबनाची कारवाई होण्यापूर्वी या शर्यतीला राज्य संघटनेने मान्यता दिलेली होती. त्यावेळी मी सचिव पदावर कार्यरत होतो. त्यामुळे त्यांच्या या फतव्याला काहीच अर्थ राहत नाही. हा वाद मिटावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. येत्या दोन-तीन दिवसांत त्यात यश मिळेल.
हा वाद लवकर मिटेल, असा विश्वास संघटनेचे अध्यक्ष सुधाकर शानबाग यांनी व्यक्त केला आहे.



येथील चिवला समुद्रात रविवारी पाचव्या राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत २४ जिल्ह्यांतील जवळपास ११८४ खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. त्यात ८५० मुले, २९० मुली आणि ४४ अपंग खेळाडूंचा सहभाग आहे. रविवारी पहाटे ६ वाजता या स्पर्धेला सुरुवात होईल. ५ कि.मी., ३ कि.मी., २ कि.मी., १ कि.मी. व ५०० मीटर या पाच गटात पार पडणार आहे. दरम्यान, सराव करताना नागपूर येथील १४ वर्षीय रिद्धी परमार या स्पर्धकाला समुद्री मासा चावल्याची घटना आज, शनिवारी सकाळी घडली.

Web Title: Setting up a detonating watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.