साक्षी सत्यव्रतसोबत घेणार ‘सात फेरे’
By admin | Published: September 7, 2016 03:41 AM2016-09-07T03:41:16+5:302016-09-07T03:41:16+5:30
आॅलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली महिला कुस्तीपटू साक्षी मलिक भारतीय पहिलवान सत्यव्रत कादियानसोबत सात फेरे घेणार आहे.
नवी दिल्ली : आॅलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकणारी पहिली महिला कुस्तीपटू साक्षी मलिक भारतीय पहिलवान सत्यव्रत कादियानसोबत सात फेरे घेणार आहे. सत्यव्रतने तिला ‘चीत’ केले. मीडिया वृत्तानुसार, साक्षीचा भाऊ सचिन याने यास दुजोरा दिला आहे. तो म्हणाला, साक्षी लवरकच पहिलवान सत्यव्रतसोबत विवाह करणार आहे.
हरियाणातील रोहटक येथे राहणारा सत्यव्रत हा देशातील नावाजलेला पहिलवान आहे. ग्लास्गो येथील राष्ट्रकूल स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकाविले होते. यावर्षी त्याने आशियाई चॅम्पियनशीपमध्ये कांस्यपदक पटकाविले होते. ९७ किलो गटातील पहिलवान सत्यव्रत हा २४ वर्षीय साक्षीपेक्षा दोन वर्षांनी लहान आहे.
या दोघांमधील संबंध हे खूप दिवसांपासून आहेत. सत्यव्रत यानेच आॅलिम्पिक पदक जिंकल्यानंतर सोशल मीडियावर साक्षीला सर्वात प्रथम शुभेच्छा दिल्या होत्या. साक्षी आणि सत्यव्रत हे दोघेही रोहटक येथील आहेत.
सत्यव्रतचे वडीलही हरियाणातील पहिलवान आहेत. ज्यांनी १९८८ मध्ये आॅलिम्पिक स्पर्धेत भाग घेतला होता. विवाहानंतर साक्षी आपले करिअर सुरू ठेवणार की नाही, याबाबत मात्र अस्पष्टता आहे.
(वृत्तसंस्था)