भारत पराभवाच्या छायेत, अर्धा संघ तंबूत
By admin | Published: March 16, 2016 08:25 AM2016-03-16T08:25:32+5:302016-03-16T08:25:32+5:30
भारताने १०.१ षटकात ७ गड्याच्या मोबदल्यात ४२ धावा केल्या होत्या. धोनी ५ धावावर आणि अश्विन ० धावावर खेळत आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १५ - भारताची तगडी फलंदाजी न्युझीलंडच्या गोलंदाजीपुढा ढेपाळली आहे. भारताचा अर्धा संघ ४० धावात तंबूत परतला आहे. भारताची आघाडीची फळी अपयशी ठरली असताना मधली फळी पत्याप्रमाणे ढासळली भारताची सगळी मदार कर्णधार एम. एस. धोनीवर अवलंबून आहे. रोहित शर्मा(५) शिखर धवन(१) रैना (१) युवराज(४) हार्दिक पांड्या (१) स्वस्तात बाद झाले तर कोहलीचा जम बसला असे वाटत असतानाच २३ धावावर बाद झाला. धोनी आणि जडेजा सध्या मैदानावर आहेत. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा भारताने १०.१ षटकात ७ गड्याच्या मोबदल्यात ४२ धावा केल्या होत्या. धोनी ५ धावावर आणि अश्विन ० धावावर खेळत आहे.