शाहिद अफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

By admin | Published: February 20, 2017 07:31 AM2017-02-20T07:31:34+5:302017-02-20T11:20:00+5:30

पाकिस्तान क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू शाहिद अफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे

Shahid Afridi retires from international cricket | शाहिद अफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

शाहिद अफ्रिदीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Next
>ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 20 - पाकिस्तान क्रिकेट संघातील अष्टपैलू खेळाडू शाहिद अफ्रिदीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. यासोबतच आपल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीला शाहिद अफ्रिदीने पुर्णविराम लावला आहे. अफ्रिदीने या महिन्याच्या सुरुवातीलाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीचे संकेत दिले होते. आपल्याला आता फ्रीलांस क्रिकेटर बनण्याची इच्छा आहे, तसंच जगभरातील वेगवेगळ्या लीगमधून खेळण्याचा आनंद आपल्याला घ्यायचा असल्याचं अफ्रिदीने म्हटलं होतं. 
 
(दाऊदने दिली शाहिद अफ्रिदीला धमकी)
(शाहिद अफ्रिदी म्हणतो 'पाकिस्तान शांतताप्रिय देश, चर्चा करुन प्रश्न सोडवा')
 
पाकिस्तानच्या या स्टार खेळाडूने अगोदरच एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटला राम-राम ठोकलेला आहे. मात्र गेल्या वर्षी भारतात पार पडलेल्या टी-20 वर्ल्ड चॅम्पिअनशिपमध्ये अफ्रिदीने पाकिस्तानी संघाचं नेतृत्व केलं होतं. 1996 मध्ये श्रीलंकेविरोधात खेळताना फक्त 37 चेंडूंवर शतक ठोकत शाहिद अफ्रिदीने क्रिकेट चाहत्यांच्या आपली दखल घेण्यास भाग पाडलं होतं. त्यानंतरच ख-या अर्थाने शाहिदीने चाहत्यांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली. हा त्याचा दुसराच सामना होता. विशेष म्हणजे शाहिद अफ्रिदीच्या या रेकॉर्डला तब्बल 17 वर्ष कोणीच तोडू शकलं नाही. 
 
आपल्या करिअरमधील उत्तरार्धात अफ्रिदी बॉलिंग ऑलराऊंडर म्हणून ओळखू जाऊ लागला. टी-20 क्रिकेटला सुरुवात झाल्यानंतर पाकिस्तानी संघाची संपुर्ण जबाबदारी अफ्रिदीवरच होती. खासकरुन 2009 मध्ये पाकिस्तानला मिळालेल्या विजयात शाहिद अफ्रिदीचा मोलाचा वाटा होता. अफ्रिदीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट करिअरमध्ये फक्त 28 कसोटी सामने खेळले. यामध्ये त्याने 1176 धावा केल्या. 156 ही त्यांची सर्वोच्च धावसंख्या ठरली. त्याने 48  विकेट्सदेखील घेतले. 
 
एकदिवसीय खेळात अफ्रिदीने एकूण 398 सामने खेळला, ज्यामध्ये त्याने 8064 धावा केल्या. एकदिवसीय सामन्यात 124 ही अफ्रिदीची सर्वोच्च धावसंख्या ठरली. तर त्याने आपल्या फिरकीच्या जोरावर 395 विकेट्सदेखील घेतले. 
 
टी 20 आंतरराष्ट्रीय करिअरमध्ये अफ्रिदीने 98 सामने खेळत 1045 धावा केल्या. यावेळी त्याने 97 विकेट्स घेतल्या. 
 

Web Title: Shahid Afridi retires from international cricket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.