शाहरुख-जुहीला ईडीचे नोटीस
By admin | Published: March 24, 2017 09:25 PM2017-03-24T21:25:18+5:302017-03-24T21:30:28+5:30
शाहरुख खान आणि अभिनेत्री जुही चावला यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने त्यांना नोटीस बजावली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - शाहरुख खान आणि अभिनेत्री जुही चावला यांच्या अडचणी वाढल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने त्यांना नोटीस बजावली आहे. कोलकाता नाईट राइडर्स स्पोटर्स प्रा. लिमिटेड'चे मालक अभिनेता शाहरूख खान, गौरी खान,जुही चावला यांना 'ईडी'ने नोटीस बजावली आहे. 'फेमा' अंतर्गत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
शेअर विक्रीत फेमा कायद्याचे उल्लघंन केल्याप्रकरणी त्यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक शाहरुख खान, गौरी खान, जुही चावला आणि तिचा पती जय मेहता यांच्यावर संघाच्या शेअर्सची किंमत कमी करुन त्याची गुंतवणूक दाखवून पैशाची हेराफेरी केल्याचा आरोप आहे. सध्या याप्रकरणी केस सुरु असून त्याच प्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
केकेआरचे मालकी हक्क शाहरुख खानची कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेन्टकडे आहेत. तर मेहता ग्रुपचे जय मेहता आणि जुही चावला हे त्याचे पार्टनर आहेत. तर संघाच्या संचालकपदी शाहरुखची पत्नी गौरी खान आहे.