शाहरुखसाठी वानखेडेवर ‘नो एंट्री’ कायम

By admin | Published: May 12, 2015 12:36 AM2015-05-12T00:36:19+5:302015-05-12T00:36:19+5:30

बॉलिवूडचा बादशाह आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक शाहरुख खान हा सलग तिसऱ्या वर्षी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करू शकणार नाही.

For Shahrukh, Wankhede has a 'No Entry' | शाहरुखसाठी वानखेडेवर ‘नो एंट्री’ कायम

शाहरुखसाठी वानखेडेवर ‘नो एंट्री’ कायम

Next

मुंबई : बॉलिवूडचा बादशाह आणि कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक शाहरुख खान हा सलग तिसऱ्या वर्षी मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये प्रवेश करू शकणार नाही.
१६ मे २०१२ रोजी मुंबईवर केकेआरने विजय नोंदविल्यानंतर शाहरुखने वानखेडेवर तंटा केल्यानंतर शाहरुख तसेच सुरक्षारक्षक आणि मुंबई क्रिकेट संघटनेच्या अधिकाऱ्यांसोबत खडाजंगी झाली होती. या घटनेनंतर एमसीएने त्याच्यावर पाच वर्षांची बंदी घातली. यंदा १४ मे रोजी केकेआर-मुंबई इंडियन्स यांच्यात होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यात त्याची उपस्थिती राहणार नाही. एमसीए अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदी सुरू असलेल्याने शाहरुखला प्रवेशाची परवानगी नाकारली जाईल. गेल्या वर्षी शाहरुखवरील बंदी अस्थायी स्वरूपात हटविण्याची इच्छा एमसीएने दर्शविली होती. २ जून रोजी आयोजित अंतिम सामन्याला शाहरुखला उपस्थित राहता यावे, असा यामागे हेतू होता; पण बीसीसीआयने हा अंतिम सामना नंतर बंगळुरुला हलविला.
मागच्या आठवड्यात बे्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या केकेआर-राजस्थान रॉयल्स या सामन्यादरम्यान शाहरुख उपस्थित होता. हे स्टेडियम वानखेडेपासून थोड्याच अंतरावर आहे. यंदा रॉयल्सने ३ सामन्यांसाठी ब्रेबॉर्नला स्थानिक स्टेडियम बनविले होते. याशिवाय, चार स्थानिक सामने त्यांनी अहमदाबादच्या मोतेरा मैदानावर खेळले. (वृत्तसंस्था)

Web Title: For Shahrukh, Wankhede has a 'No Entry'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.