टी २० विश्वचषकानंतर शेन वॉट्सनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

By admin | Published: March 24, 2016 04:54 PM2016-03-24T16:54:34+5:302016-03-24T17:02:44+5:30

ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉट्सन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वीच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती स्वीकारली होती

Shane Watson retires from international cricket after T20 World Cup | टी २० विश्वचषकानंतर शेन वॉट्सनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

टी २० विश्वचषकानंतर शेन वॉट्सनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Next
>ऑनलाइन लोकमत
सिडनी, दि. २४ - ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू शेन वॉट्सन याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. यापुर्वीच गेल्या वर्षी त्याने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून तडकाफडकी निवृत्ती स्वीकारली होती. सध्या तो टी २० विश्वचषकात खेळत आहे. ही स्पर्धा सुरु होण्यापुर्वीच आपण आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर निवृत्त होणार असल्याचे संकेत दिले होते. ऑस्ट्रेलियन न्युजच्या वृत्तानुसार टी २० विश्वच।कानंतर तो वॅटसन निवृत्त होणार आहे. वॅटचनच्या निवृत्तीची जोरदार चर्चा सोशल मिडियावर सुरु आहे. 
 
वॅटसनच्या आंतरराष्ट्रीय कामगीरीवर एक नजर
कसोटी - 
२ जानेवारी २००५ मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यास सुरवात केली. ५९ कसोटी सामन्यांमध्ये ३५.१९ च्या सरासरीने ३,७३१ धावा केल्या आहेत. तर ७५ विकेटही त्याच्या खात्यात जमा आहेत. कसोटीमध्ये ४ शतके आणि २४ अर्धशतके त्याच्यानावावर आहेत. १७६ धावंची खेळी कसोटी मधील सर्वोत्कृष्ट खेळी आहे. 
एकदिवसीय -
२४ मार्च २००२मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पन. १९० एकदिवसीय सामन्यात ४०.५४ च्या सरासरीने ६३६५ धावा केल्या आहेत. तर १६८ विकेटही त्याच्या खात्यात जमा आहेत. एकदिवसीय सामन्यात ९ शतके आणि ३३ अर्धशतके त्याच्यानावावर आहेत. १८५ धावंची खेळी कसोटी मधील सर्वोत्कृष्ट खेळी आहे. 
टी २० - २० फेब २००६ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी २०त पदार्पन
टी २०च्या ५६ सामन्यात २८ च्या सरासरीने १४०० धावा केल्या आहेत. तर ४६ विकेटही त्याच्या खात्यात जमा आहेत. टी २०त १ शतके आणि १० अर्धशतके त्याच्यानावावर आहेत. १२४ धावंची खेळी कसोटी मधील सर्वोत्कृष्ट खेळी आहे.
 
आयपीलच्या ७८ सामन्यात ३६.४९च्या सरासरीने २३७२ धावा केल्या आहेत तर  तर ६१ विकेटही त्याच्या खात्यात जमा आहेत. 

Web Title: Shane Watson retires from international cricket after T20 World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.