शारापोवा पुन्हा युएनची गुडविल अ‍ॅम्बॅसडर

By admin | Published: November 12, 2016 01:34 AM2016-11-12T01:34:45+5:302016-11-12T01:34:45+5:30

रशियाची टेनिसस्टार मारिया शारापोवा हिला गेल्यावर्षी लादलेली बंदी हटल्यावर पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाची गुडविल अ‍ॅम्बॅसडर बनवण्यात आले आहे.

Sharapova again recovers UN Goodwill Ambassador | शारापोवा पुन्हा युएनची गुडविल अ‍ॅम्बॅसडर

शारापोवा पुन्हा युएनची गुडविल अ‍ॅम्बॅसडर

Next

न्यूयॉर्क : रशियाची टेनिसस्टार मारिया शारापोवा हिला गेल्यावर्षी लादलेली बंदी हटल्यावर पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाची गुडविल अ‍ॅम्बॅसडर बनवण्यात आले आहे.
युएनडीपीने आपल्या वक्तव्यात म्हटले आहे की, ‘‘मारिया शारापोवा ही पुन्हा एकदा खेळात परतत आहे. याचा युएनडीपीला आनंद होत आहे. तिच्यावरील बंदी उठल्यावर तिला पुन्हा एकदा संस्थेची गुडविल अ‍ॅम्बॅसडर बनवण्यात आले आहे.’’
पाचवेळच्या ग्रॅण्डस्लॅम विजेत्या शारापोवाला फेब्रुवारी २००७ मध्ये या संस्थेची ब्रँड अ‍ॅम्बॅसडर बनवण्यात आले. मात्र, डोप टेस्टमध्ये मेल्डोनियम नावाचे औषध आढळल्याने तिच्यावर क्रीडा लवादने दोन वर्षांची बंदी घातली आहे. यानंतर युएनडीपीने शारापोवासोबत काम न करण्याचा निर्णय घेतला. या बंदीमुळे शारापोवा रियो आॅलिम्पिक स्पर्धेत खेळू शकली नाही.

Web Title: Sharapova again recovers UN Goodwill Ambassador

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.