शारापोव्हाला पराभवाचा धक्का

By admin | Published: September 1, 2014 08:00 PM2014-09-01T20:00:31+5:302014-09-01T20:00:31+5:30

यूएस ओपन टेनिस : फेररही बाहेर, रॉजर फेडरर चौथ्या फेरीत

Sharapova defeats defeat | शारापोव्हाला पराभवाचा धक्का

शारापोव्हाला पराभवाचा धक्का

Next
एस ओपन टेनिस : फेररही बाहेर, रॉजर फेडरर चौथ्या फेरीत
न्यूयॉर्क : रशियन टेनिस संुदरी मारिया शारोपोव्हा हिला अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या चौथ्या फेरीत कॅरोलिन वोज्नियाकीकडून पराभव स्वीकारावा लागल्यामुळे स्पर्धेत गाशा गुंडाळावा लागला़ या पाठोपाठ स्पेनच्या डेव्हिड फेररनेही घरचा रस्ता धरला़ मात्र, स्वीत्झर्लंडचा रॉजर फेडरर स्पर्धेची चौथी फेरी गाठण्यात यशस्वी ठरला़
पाच वेळा ग्रँडस्लॅम विजेती आणि २००६ मध्ये येथे किताब जिंकणार्‍या शारोपोव्हाला डेन्मार्कच्या १० वे मानांकन प्राप्त कॅरोलिनचे आव्हान मोडून काढता आले नाही़ एकेरीच्या अटीतटीच्या लढतीत वोज्नियाकीने ६-४, २-६, ६-२ असा विजय मिळवून स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला़
पुरुष एकेरी गटातील तिसर्‍या फेरीच्या सामन्यात स्वीत्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने स्पेनच्या मार्सेल ग्रेनोलर्सवर ४-६, ६-१, ६-१, ६-१ असा विजय मिळवून थाटात चौथ्या फेरीत मजल मारली़ विशेष म्हणजे या लढतीत फेडररला पहिला सेट गमवावा लागला होता़ मात्र, यानंतर त्याने जोरदार मुसंडी मारताना सामन्यात बाजी मारली़
अन्य लढतीत २६ वे मानांकन प्राप्त फ्रान्सच्या जाईल्स सिमोन याने स्पेनच्या डेव्हिड फेररचा ६-३, ३-६, ६-१, ६-३ असा फडशा पाडताना मोठा उलटफेर केला, तर फ्रान्सच्या गाएल मोफिल्स याने आपल्याच देशाच्या रिचर्ड गास्कटला सरळ सेटमध्ये ६-४, ६-२, ६-२ ने धूळ चारून स्पर्धेच्या चौथ्या फेरीत प्रवेश केला़
पुरुष गटात झेक प्रजासत्ताकच्या टॉमस बेर्डिच याने रशियाच्या तेमुराज गाबाशिविलवर ६-३, ६-२, ६-४ ने सरशी साधली, तर बुल्गेरियाच्या ग्रिगोर दिमित्रोव्हने बेल्जियमच्या डेव्हिड गोफिनचा ०-६, ६-३, ६-४, ६-१ असा पराभव करीत चौथी फेरी गाठली़
अव्वल महिला खेळाडूंना स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले असले, तरी इटलीच्या सारा इरानी हिने आपले विजयी अभियान कायम राखले़ तिने क्रोएशियाच्या मिरजाना लुसी बरोनीचा ६-२, २-६, ६-० असा पराभव करीत चौथ्या फेरीत प्रवेश केला़ अन्य एकेरी लढतीत स्वीत्झर्लंडच्या बेलिंडा बेनसिस हिने माजी नंबर वन खेळाडू येलेना यांकोविचवर ७-६, ६-३ असा विजय मिळवून अंतिम आठ खेळाडूंत स्थान निश्चित केले़ बेनसिस हिला पुढच्या फेरीत आता चीनच्या पेंग शुआईचा सामना करावा लागेल़ शुआईने झेक प्रजासत्ताकच्या सफरोव्हावर ६-३, ६-४ अशा गुण फरकाने सरशी साधली़

Web Title: Sharapova defeats defeat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.